‘दगडूशेठ’ मंदिरात 51 हजार दिव्यांसह दीपाेत्सव

    01-Dec-2020
Total Views |
 
nhh_1  H x W: 0
 
पुणे, 30 नाेव्हेंबर (आ.प्र.) : श्री गणेशाला फळ-भाज्यांसह मिठाई, फराळाच्या तिखट-गाेड निवडक पदार्थांचा ‘अन्नकाेट’ आणि सभामंडपात व मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या शेकडाे दिव्यांच्या प्रकाशाने ‘दगडूशेठ गणपती मंदिर’ उजळून निघाले.
दरवर्षी माेठ्या प्रमाणात हाेणारा ‘अन्नकाेट’ यावर्षी साध्या पद्धतीने ठेवण्यात आला. त्रिपुरारी पाैर्णिमेनिमित्त (रविवार, 29 नाेव्हेंबर) मंदिराच्या प्रवेशद्वारापासून ते कळसापर्यंत सुमारे 51 हजार दिव्यांची केलेली सजावट लक्षवेधी ठरली.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने याचे आयाेजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, कार्यकर्ते उपस्थित हाेते.कार्यक्रमाचे यावर्षी 22 वे वर्ष हाेते.ट्रस्टचे अध्यक्ष अशाेक गाेडसे म्हणाले की, त्रिपुरारी पाैर्णिमेनिमित्त दरवर्षी माेठ्या प्रमाणात अन्नकाेटचे आयाेजन केले जाते. तब्बल 500 हून अधिक पदार्थ गाेळा हाेतात.मात्र, यावर्षी अत्यंत साध्या पद्धतीने दीपाेत्सव व अन्नकाेट साजरा केला.आराेग्यसंपन्न जगाकरिता गणरायाला साकडे घातले आहे.