तेरा काेटी लाेकांना डायबिटीस हाेण्याचा धाेका

    01-Dec-2020
Total Views |

/;p_1  H x W: 0
 
नवी दिल्ली, 30 नाेव्हेंबर (वि.प्र.) : मेट्राे शहरातील लाेकांची बदलती जीवनशैली डायबिटीस व्हायला कारणीभूत हाेत आहे. ही स्थिती अशीच राहिली तर देशात डायबिटीस रुग्णांची संख्या 13 काेटी 4 लाख हाेईल, असा अंदाज एम्स हाॅस्पिटलच्या एन्डाेक्रिनाेलाॅजी अँड मेटॅबाेलिझम विभागाच्या युराेपियन असाेसिएशन ऑफ द स्टडीज ऑफ डायबिटीसने व्यक्त केला आहे.या अंदाजानुसार, देशात 20 वर्ष वयाच्या मुलींमध्ये 65% आणि मुलांमध्ये 55% डायबिटीस रुग्ण हाेण्याची शक्यता आहे. यापैकी बहुतेक टाइप-2 डायबिटीसचे रुग्ण जास्त असतील. याचे मुख्य कारण आहाराच्या गुणवत्तेची घसरण आणि शारीरिक हालचाली कमी हाेणे, हेच आहे. यामुळे बाॅडी मास इंडेक्स वाढताे व माणसाला डायबिटीस हाेताे. या अध्ययनात भारताची परदेशाशी तुलना करण्यात आली आहे. त्यानुसार अमेरिकेत 45 वर्षांच्या वयात 31% पेक्षा जास्त आणि नेदरलँडमध्ये 25 वर्षांच्या वयात डायबिटीस रुग्णांची संख्या 38% आहे. या संदर्भात सविस्तर माहिती देताना एम्सचे प्राे. निखिल टंडन यांनी सांगितले की, जर 40 आणि 60 वर्षांच्या वयात महिलांचे जीवनचक्र पाहता हा धाेका अनुक्रमे 59% आणि 37% पेक्षा जास्त आहे. तर पुरुषांमध्ये हा धाेका वयाच्या 40व्या वर्षांत तर 60 वर्षांच्या वयात 27% लाेकांना डायबिटीस हाेण्याची शक्यता असते. जर 20 वर्षांच्या मुली व मुले लठ्ठ असतील तर त्यांना डायबिटीस हाेण्याची शक्यता 20% जास्त असते.