आता रंगीत कापूस पिकवणे शक्य हाेणार

    01-Dec-2020
Total Views |
 
1`_1  H x W: 0
 
सिडनी, 30 नाेव्हेंबर (वि.प्र.) : ऑस्ट्रेलियाच्या शास्त्रज्ञांनी कापसाचा आण्विक जेनेटिक कलर काेड शाेधून काढला आहे. त्यामुळे रंगीबेरंगी कापड बनविण्यासाठी कापडाला रासायनिक रंग देण्याची गरज राहणार नाही. कारण आता रंगीत कापसाचे पीक घेणे शक्य हाेईल. सध्या फक्त इस्रायलमध्येच रंगीत कापूस पिकताे.हा कापूस बायाेडिग्रेडेबल असल्यामुळे कापडावर वळ्या पडत नाही. काॅमनवेल्थ सायंटििफक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशनच्या शास्त्रज्ञांनी ताे शाेधून काढला आहे. शास्त्रज्ञांनी निरनिराळ्या रंगांच्या तंतूंची राेपे तयार केली आहेत. या राेपांची शेतात लागवड करण्यात येणार आहे.जगात सध्या 60% पेक्षा जास्त पाॅलिएस्टर कापड तयार हाेत आहे. हे पाॅलिएस्टर 200 वर्षे नष्ट हाेत नाही. या एक किलाे कापडाला रंग देण्यासाठी 1000 लिटर पाणी खर्च हाेते; पण आता कलर काेड सापडल्यामुळे कापड रंगविण्याची गरजच राहणार नाही. त्यामुळे हजाराे लिटर पाणी वाया जाणार नाही.