अकरा हजार दिव्यांनी उजळले महालक्ष्मी मंदिर

    01-Dec-2020
Total Views |
त्रिपुरारी पाैर्णिमेनिमित्त उत्साहात दीपाेत्सव व फुलांची आरास
 
nm;p_1  H x W:
 
पुणे, 30 नाेव्हेंबर (आ.प्र.) : विविधरंगी पणत्यांसह दिव्यांची आकर्षक आरास, नानाविध फुलांची सजावट व विद्युत राेषणाईने उजळलेल्या श्री महालक्ष्मी मंदिराचे विलाेभनीय दृश्य त्रिपुरारी पाैर्णिमेला पाहायला मिळाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंगलमय, धार्मिक वातावरणात 11 हजार पणत्यांचा दीपाेत्सव मंदिरात करण्यात आला.श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे या साेहळ्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर यांच्यासह विश्वस्त, पदाधिकारी उपस्थित हाेते. सुलभा देशमुख, मधू शिताेळे यांनी फुलांच्या रांगाेळीची, तर ॠषिकेश माेरे, प्रवीण घुले, तुकाराम जाधव, गुरुनाथ चव्हाण यांनी दीपाेत्सवातील पणत्यांची आरास केली.महिलांनी विविधरंगी वेशभूषेत दीपाेत्सवात भाग घेतला. सुगंधी फुलांद्वारे आणि दिव्यांच्या प्रकाशातून निराेगी भारताचा संदेश या निमित्ताने देण्यात आला.दीपाेत्सवात मंदिरातर्फे कुठेही प्लॅस्टिकचा वापर हाेणार नाही, सर्व गाेष्टी पर्यावरणपूरक असतील, याकडे लक्ष देण्यात आले हाेते.त्रिपुरारी पाैर्णिमेला आम्ही दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहाने दीपाेत्सव साजरा करीत आहाेत. शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून या सर्व गाेष्टी केल्या जात आहेत.निराेगी भारत सशक्त भारत हाेण्याच्या दृष्टीनेदेखील आम्ही देवीकडे प्रार्थना करीत असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.