सर्वांत माेठी फुलांची बाग

    01-Dec-2020
Total Views |
 
३४._1  H x W: 0
 
संयुक्त अरब अमिराती, यूएईची राजधानी दुबईमध्ये जगाची सर्वांत माेठी फुलांची बाग नुकतीच जनतेला पाहण्यासाठी खुली केली आहे. या बागेत 15 काेटी फुलांच्या आणि 120 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. ही बाग 72,000 चाैरस मीटर जागेत तयार करण्यात आली आहे. त्यात अमिराती एअरलाईन्सचे ए-380 विमानसुद्धा आहे. हे जगातील सध्या सर्वांत माेठे विमान आहे. 2013 मध्ये गिनीज बुक ऑफ रेकाॅर्डसमध्ये या बागेचे सर्वांत माेठे व्हर्टिकल गार्डन असल्याची नाेंद केली हाेती. आता ही बाग जनतेसाठी आणि पर्यटक लाेकांसाठी खुली करण्यात आली आहे.