‘एमएमआरडीए’ने इलेक्ट्रिक बस उपलब्ध करून द्याव्यात : महापाैर नरेश म्हस्के

    01-Dec-2020
Total Views |
 
nm,lo_1  H x W:
 
ठाणे, 30 नाेव्हेंबर (आ.प्र.) : ठाणे महापालिका परिवहन सेवेची वाढती मागणी लक्षात घेता, प्रवाशांच्या साेयीसाठी प्रदूषणविरहित इलेक्ट्रिक बस उपलब्ध करून देण्याची मागणी महापाैर नरेश म्हस्के यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे व महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांच्याकडे पत्राद्वारे केली.ठाण्यात सध्या 95 मार्गांवर नागरिकांना किफायतशीर बससेवा देण्यात येत आहे, परंतु गेल्या काही काळात ठाणे शहराबराेबरच मुंब्रा, दिवा भागातही नागरीकरण झपाट्याने झाले असून, बससेवेची मागणी वाढत आहे. पालिका परिवहनच्या ताफ्यात सध्या 300 बस कार्यरत आहेत. तथापि, लाेकसंख्येच्या मानाने ही बससंख्या अपुरी पडत आहे. ठाणे शहरांतर्गत प्रवास करणारे चाकरमानी, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय असल्याने बससेवेची मागणी वाढत आहे. त्यामुळे प्रदूषणविरहित बस चालवण्याचा महापालिकेचा मानस आहे. या दृष्टीने एमएमआरडीएच्या विकास निधीतून किमान 100 इलेक्ट्रिक बस उपलब्ध द्याव्यात. त्यामुळे ठाणेकरांना अधिक सक्षमतेने बससेवा उपलब्ध करून देता येईल, असे महापाैरांनी पत्रात नमूद केले आहे.सध्या ठाण्यासह मुलुंड स्थानक, बाेरिवली, मिराराेड, नारपाेली, तसेच माजिवडा गाेल्डन नाका ते कल्याण फाटा या मार्गावर बससेवा सुरू करण्यात आली आहे.