पृथ्वीवर आणि एकूणच विश्वात अनेक घटना-घडामाेडी घडून गेल्या, घडत आहेत आणि घडतील.पूर्वजांनी त्यांची नाेंद ठेवली असल्यामुळे आपल्याला त्यांची माहिती मिळते, पण मुद्दा येताे विश्वासार्हतेचा. काही वेळा खऱ्या घटना खाेट्या वाटतात आणि खाेट्या घटना खऱ्या. आजही अनेक घटनांबाबत आपल्या चुकीच्या समजुती कायम आहेत. काही वेळा अश्नय, अत्नर्य वाटणाऱ्या घटना सत्य असतात आणि खरे असल्याच्या वाटत असलेल्या चुकीच्या. काही महत्त्वाच्या घटना, समजुतींबाबत आपली मते बदलण्याची वेळ आता आली आहे. पाहा, काय आहेत त्या घटना.
‘आदिदास’ आणि ‘प्युमा’चे संस्थापक हे भाऊ हाेते : आदी आणि रूडी डॅसलर यांनी 1924मध्ये ‘डॅसलर ब्रदर्स शू फॅ्नटरी’ या नावाने व्यवसाय सुरू केला. जेसी ओवेन्ससह अनेक प्रख्यात खेळाडूंसाठी त्यांनी बूट तयार केले; पण 1948मध्ये दाेन्ही भावांमध्ये वाद हाेऊन कंपनीचे विभाजन झाले. आदीने ‘आदिदास’, तर रूडीने ‘प्युमा’ ही कंपनी सुरू केली.
‘द विझार्ड ऑफ ओझेड’ कादंबरीतील डाेरेथीचे बूट लाल रंगाचे नव्हते : एल. फ्रँक बाऊम यांनी 1900मध्ये लिहिलेल्या या कादंबरीतील डाेरेथी या नायिकेचे बूट चंदेरी रंगाचे असल्याचे म्हटले आहे; पण त्यावर 1939मध्ये काढण्यात आलेल्या रंगीत चित्रपटात चंदेरी रंगापेक्षा लाल रंगचे बूट जास्त आकर्षक असल्याचे दिसले. चित्रीकरणासाठी या बुटांचे चार जाेड बनविण्यात आले हाेते. त्यातील एक जाेडी ज्युडी गार्लंड संग्रहालयातून 2005मध्ये चाेरीला गेली हाेती आणि गेल्या वर्षी ती परत सापडली.
इतिहासातील सर्वांत लहान युद्ध 38 मिनिटांचे हाेते : झांजिबारचा सुलतान आणि ब्रिटिशांमध्ये हे युद्ध झाले. ब्रिटिशांचे संरक्षण असलेला झांजिबारचा सुलतान 1886मध्ये मरण पावला आणि ब्रिटिशांची परवानगी न घेताच नवा सुलतान सत्तेवर आला. त्याचे नाव सुलतान खालिद बिन बर्गश असे हाेते. त्याने सत्ता साेडण्यास नकार दिल्यामुळे ब्रिटिशांच्या लढाऊ जहाजांनी सुलतानाच्या राजवाड्यावर बाँबफेक केली.त्यामुळे सुलतान पळून गेला आणि हे अँग्लाे-झांजिबार युद्ध अवघ्या 38 मिनिटांत संपले.