तुम्ही ‘शिंपी’ पक्षी पाहिला आहे का?

06 Nov 2020 12:22:21

n,9_1  H x W: 0 
 
शिंपी हा छाेटा पक्षी आहे. याला हिंदी मध्ये दर्जी तर इंग्लिशमध्ये काॅमन टेलरबर्ड अशी नावे आहेत उत्तम घरटे विणणारा पक्षी म्हणून हा ओळखला जाताे. वरून हिरवा, खालून फिकट पांढरा आणि डाेके तांबूस, शेपटीतून दाेन अणकुचीदार पिसे निघालेली असतात व हा आपली शेपटी वर ठेवताे. वीण काळात नराची ही पिसे जास्त लांब हाेतात. शिंपी पक्षी अतिशय सक्रिय आहे. एकट्याने किंवा जाेडीने कीटक शाेधत आणि पिची, पिची, पिची असा काहीसा आवाज काढत सर्वत्र फिरत राहताे. हा पक्षी अतिशय चळवळ्या आहे. एका झुडपातून दुसऱ्या झुडपात किंवा जमिनीवर टुणटुण उड्या मारीत सारखा भटकत असताे. ताे अतिशय धीट असल्यामुळे पुष्कळदा घराच्या व्हरांड्यातही येताे. पाने शिवण्यासाठी ताे चाेचीचा सुईप्रमाणे आणि काेळ्याच्या जाळ्यांचा किंवा वनस्पतीच्या तंतूचा दाेऱ्याप्रमाणे उपयाेग करताे. एक किंवा दाेन पाने शिवून ताे त्याची आधी पुंगळी बनविताे. ती खालच्या बाजूने शिवून बंद करताे. या पिशवीत कापूस किंवा इतर मऊ पदार्थ घालून ताे घरटे तयार करताे. वड, पिंपळ यांच्या पानांपासून ताे घरटे तयार करताे. ताे पक्ष्यांमधील अतिशय कुशल वास्तुकार आहे. अंड्याचे व त्यावर बसणाऱ्या पक्ष्याचे वजन सहन करण्याइतके घरटे मजबूत करण्याची ताे काळजी घेताे. नर व मादी दाेघे मिळून घरटे तयार करतात.
Powered By Sangraha 9.0