शंख आणि शिंपले कसे तयार हाेतात?

04 Nov 2020 11:27:20

n.98_1  H x W:
 
गाेगलगायी, कवड्या, लिंपेट, हेटेराेपाॅड अशा मऊ प्राण्यांच्या अंगावर जे संरक्षणात्मक कवच असते त्याला शंख, शिंपले असे म्हणतात. शंखशिंपल्यांच्या प्रकारांतील कवड्या प्राचीन काळी चलन म्हणून वापरल्या जात असत. शिंपल्यातील मृदुकाय प्राण्यांना मृत्यू आल्यास, त्या शिंपल्यात इतरसागरी प्राणी काही काळ राहतात. जसे की खेकडे. संकट आले तर प्राणी शिंपल्याचे दार बंद करून घेतात. असे शिंपले त्यांच्या दारांसह जपून ठेवण्याची काळजी शंखशिंपल्यांचे संग्राहक घेतात. प्राचीन काळापासून शंखशिंपल्यांची आभूषणे वापरण्याची प्रथा आढळते. आदिवासी जमातींमध्ये ही प्रथा आजही आढळते. दागदागिने, स्थापत्य आणि मूर्तिकला यांत शंखशिंपल्यांना महत्त्वाचे स्थान लाभले आहे. शिंपल्यांवर काेरीव काम करून जयपूर येथे त्यांचे दागिने तयार करतात. विशाखापट्टनम येथे कासवाच्या कवचांच्या पृष्ठभागांवर काेरीव कामे करतात.गुजरात, मुंबई या भागांत शंखशिंपल्यांचे लहानलहान दागिने तयार करतात. पश्चिम बंगाल आणि दक्षिण भारतात अनेक प्रकारांच्या डब्या तयार करून त्यांवर कवड्या बसवून आतील भागावर रंगीत कापड लावतात. राजस्थानात शंखशिंपल्यांपासून उंट आणि इतर प्राण्यांचे सुशाेभित साज तयार करून त्यांत लहानलहान आरसे आणि रंगीत कापड बसवितात. हल्ली माेठ्या शिंपल्यांपासून भांडी, दिव्यांच्या शेड्स, लहानलहान बशा, मानवाच्या तसेच चित्रविचित्र प्राण्यांच्या चित्राकृती तयार करतात.
 
Powered By Sangraha 9.0