विश्व व मानवी मेंदूत काय आहे साम्य?

    30-Nov-2020
Total Views |
 
mjk_1  H x W: 0
 
निसर्गाच्या पाेटात काय दडलेय, ते शाेधणे साेपी गाेष्ट नाही. वर्षानुवर्षे शास्त्रज्ञांकडून त्याचा शाेध सुरूच आहे आणि सुरूच राहील. आता अवकाशशास्त्रज्ञ आणि मेंदूराेगतज्ज्ञ एकत्र आले आहेत. एकत्र येऊन त्यांनी जगातील दाेन अत्यंत गुंतागुंतीच्या गाेष्टींची तुलना सुरू केली आहे.हे विश्व अनेक आश्चर्यांनी भरून गेले आहे आणि ते तेवढेच गुंतागुंतीचे आहे.मानवाचा मेंदूही तेवढाच गुंतागुंतीचा आहे. मात्र, आपण विचारही करू शकणार नाही, तेवढे रचनात्मक साधर्म्य या दाेघांमध्ये आहे. या दाेन गुंतागुंतीच्या प्रणालींमधील भेद व साम्य यांचा अभ्यास अलीकडेच शास्त्रज्ञांनी केला आहे. विश्व व आकाशगंगा आणि मानवी मेंदू व मज्जातंतू या दाेन्ही गाेष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. तरीही त्यात साम्य आहे.हे विश्व आणि मानवी मेंदू हे दाेन्ही पूर्ण वेगळे आहेत. पण दाेन्हींची रचना मात्र बरीचशी सारखी आहे. काही वेळा तर या दाेन्ही संस्था खूपच सारख्या वाटतात. शास्त्रज्ञांच्या अभ्यासातून असेही दिसून आले, की दाेन पूर्णपणे वेगळ्या प्रक्रिया कधीकधी खूपच सारख्या असू शकतात. मानवी मेंदू हे सुमारे सात काेटी मज्जातंतूंचे जाळे आहे, तर विश्वामध्ये सुमारे 100 अब्ज आकाशगंगा आहेत, असे मानले जाते.या दाेन्ही यंत्रणांनी मिळून एक अत्यंत गुंतागुंतीचे जाळे तयार केले आहे. ते सगळे तंतू आणि केंद्रांनी बनलेले आहेत.जेव्हा या दाेन्ही प्रतिमांची तुलना केली जाते तेव्हा काही सारखेपणा त्यात दिसताे. मज्जातंतू आणि आकाशगंगा यांच्यातही खूप सारखेपणा असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात.