सीमांवर चाैक्या, रेल्वे, विमानांवर नजर

30 Nov 2020 11:32:44
परप्रांतातून येणाऱ्यांवर प्रशासनाचे विशेष लक्ष
 
नागपूर, 29 नाेव्हेंबर (आ.प्र.) : काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता परप्रांतांतून उपराजधानीत दाखल हाेणाऱ्या प्रत्येकावर करडी नजर ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.विमानाने प्रवास करणाऱ्यांसाेबतच, रेल्वेने प्रवास करणाऱ्यांकडेही विशेष लक्ष दिले जाणार आहे. परप्रांतांतून रस्त्याने येणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी जिल्हा सीमांवर चाैक्या बसवण्यात आल्या आहेत.
दिवाळीनंतर राज्यात काेराेना संक्रमण वाढत असल्याने राज्य शासनाने नवे दिशानिर्दे श जारी केले आहेत. यानुसार परराज्यांतून येणाऱ्या प्रवाशांनी आरटी-पीसीआर चाचणी केल्याचा अहवाल दाखवणे बंधनकारक केले आहे. उपराजधानीतही याच आदेशानुसार येणाऱ्यांची आरटी-पीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.दिल्ली, राजस्थान, गुजरात व गाेवा या चार राज्यांतून महाराष्ट्रात रेल्वे, विमान व रस्तेमार्गाने येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी ही चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. शहराच्या सीमांवरही नजर राहणार आहे. तसेच रेल्वे, रस्तेमार्गे परराज्यांतून येणारे प्रवासी, तसेच विमानाने येणाऱ्या प्रवाशांचीही तपासणी करण्यात येईल.
 
Powered By Sangraha 9.0