तृतीयपंथी भिकारी शिकून झाली वकील

    30-Nov-2020
Total Views |
 
nmu_1  H x W: 0
 
नवी दिल्ली, 29 नाेव्हेंबर (वि.प्र.) : एखाद्याचे नशीब चांगले असले, तर काय हाेऊ शकते याचा अनुभव पाकिस्तानातील एका तृतीयपंथी भिकारी महिलेला आला आहे.तिचे नाव आहे निशा राव आणि आता ती चक्क न्यायाधीश झाली आहे. ही निशा एकेकाळी पाकिस्तानच्या रस्त्यावर भीक मागत असे. भिकेतून मिळणाऱ्या पैशातून तिने वकिलीचे शिक्षण घेतले आणि तृतीयपंथीयांच्या केसेस ती लढवू लागली.अनेक केस तिने जिंकल्या आणि आता कायद्यात बदल झाल्याने ती न्यायाधीश हाेणार आहे. 18 वर्षांची असताना घरातून पळून गेलेल्या निशाने सिग्नलवर भीक मागून गुजराण केली. मात्र, शिकण्याचा मार्ग साेडला नाही. आज ती कराची बार असाेसिएशनची सदस्य आहे.