घरातील दुर्गंधी अशी दूर करा

    30-Nov-2020
Total Views |
एखादा अन्नपदार्थ फ्रिजमध्ये उघडा ठेवल्यास त्याचा वास संपूर्ण फ्रिजमध्ये पसरताे. अशा वेळी लिंबूपाण्याचा पेला फ्रिजमध्ये ठेवल्यास दुर्गंधी नष्ट हाेते.

m,k_1  H x W: 0
 
अनेकदा आपण कुणाच्या घरी गेलाे तर एक वेगळाच वास येत असताे. अनेकदा आपल्या घरातील फाेडणीमुळे देखील असा वास येत असताे. आपल्याला तर हा वास त्रास देताेच. पण समजा आपल्या घरात काेणी बाहेरची व्यक्ती आली तर अशा वेळी आपल्या घराबद्दलचे त्याचे विपरीत मत तयार हाेते. त्यामुळे घर नीटनेटके ठेवताना ते दुर्गंधीमुक्तही असणे गरजेचे असते. आपण घराची सजावट करताना उत्तम रंगरंगाेटी, फर्निचर, पडदे, विविध वस्तूंची रचना याचा तपशीलवार विचार करताे. त्याचप्रमाणे घरातील दुर्गंधीचाही विचार केलाच पाहिजे. खरे तर अशा वेळी अगदी तुमच्या राेजच्या वापरातील गाेष्टीदेखील ही दुर्गंधी नष्ट करू शकतात. पण त्याची आपल्याला माहिती नसते. त्यासाठी एका वाटीत एक कप पाणी घ्या. ते पाणी मंद आचेवर गरम करा. त्यानंतर त्या पाण्यात संत्र्यांच्या साली घाला.आणि ते उकळवा. त्यानंतर त्यामध्ये दालचिनी आणि वेलची घाला.या पाण्यामुळे किचनमधली दुर्गंधी नक्कीच दूर जाईल. खरे तर हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण टाेस्ट घरातील दुर्गंधी दूर करण्यासाठी प्रचंड फायदेशीर आहे. एक टाेस्ट उघड्यावर ठेवल्यास किचनमधील दुर्गंधी दूर हाेईल. स्वयंपाक बनवताना बेकिंग साेडा थाेडा पसरवून ठेवावा यामुळे दुर्गंधी पूर्णपणे नष्ट हाेते. तसेच बेकिंग साेड्यामुळे करपलेल्या पदार्थांचा वासदेखील नष्ट हाेताे. फ्रिजमधून दुर्गंधी कायम येत असते. एखादा अन्नपदार्थ फ्रिजमध्ये उघडा ठेवल्यास त्याचा वास संपूर्ण फ्रिजमध्ये पसरताे. अशा वेळी लिंबूपाणी सर्वात बेस्ट उपाय आहे. लिंबूपाण्याचा पेला फ्रिजमध्ये ठेवल्यास दुर्गंधी नष्ट हाेईल. व्हिनेगरने जळलेल्या पदार्थांचा वास दूर हाेताे. तसेच त्यातील दुर्गंधी देखील नष्ट हाेते. घरातील फरशी आणि ओटा पुसण्यासाठी देखील तुम्ही या व्हिनेगरचा वापर करू शकता. अशा छाेट्या छाेट्या गाेष्टींतून घरातील दुर्गंधी सहजपणे दूर करता येते. ती झाली की तुम्ही रुमफ्रेशनरने घर सुवासिक ठेवू शकता.