कर भरण्यासाठी आता शनिवारीही ठाण्यात संकलन केंद्रे सुरू राहणार

    30-Nov-2020
Total Views |
 
m,k_1  H x W: 0
 
ठाणे, 29 नाेव्हेंबर (आ.प्र.) : नागरिकांना 2020-2021 या आर्थिक वर्षातील मालमत्ताकर वेळेत भरता यावा, यासाठी महापालिकेची सर्व प्रभाग समिती कार्यालये व उपप्रभाग कार्यालये 31 डिसेंबरपर्यंत सर्व शनिवारी सकाळी साडेदहा ते दुपारी साडेचार या वेळेत सुरू ठेवण्याचे आदेश ठाणे महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी दिले आहेत.महापालिका क्षेत्रातील नागरिकांना मालमत्ताकर मुदतीत भरणे साेयीचे व्हावे, यासाठी पालिकेची सर्व प्रभाग व उपप्रभाग स्तरावरील सर्व करसंकलन केंद्र, तसेच महापालिका प्रशासकीय भवनातील नागरी सुविधा केंद्रातील करसंकलन केंद्र 31 डिसेंबरपर्यंत सर्व शनिवारी आणि 25 डिसेंबरला नाताळनिमित्त असलेल्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सकाळी साडेदहा ते दुपारी साडेचार या वेळेत सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.महापालिकेच्या  www.thanecity. gov.in  या संकेतस्थळावर मालमत्ताकर ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे, तसेच डीजीठाणे या डिजिटल प्रणालीद्वारेही मालमत्ताकर जमा करण्याची अतिरिक्त सुविधा उपलब्ध आहे. सर्व मालमत्ताधारकांनी कर वेळेत भरावा, असे आवाहनही महापालिकेने केले आहे.