पाेलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध : मुख्यमंत्री

    30-Nov-2020
Total Views |
शहिदांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत राज्य पाेलीस महासंचालनालयातील हुतात्मा स्मारकाचे उद्घाटन
 
nmju_1  H x W:
 
मुंबई, 29 नाेव्हेंबर (आ.प्र.) : सण, उत्सव वा सभा असाे, गर्दीवरील नियंत्रणासाठी आमचे पाेलीस चाेवीस तास कर्तव्य बजावत असतात. स्वत:च्या कुटुंबातील, घरातील सुख-दु:ख बाजूला ठेवून नागरिकांच्या सुख-दु:खात सहभागी हाेणाऱ्या पाेलिसांचा मला अभिमान आहे. पाेलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन सदैव कटिबद्ध असून, त्यांच्यासाठी जे जे करणे शक्य आहे ते सर्व केले जाईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.महाराष्ट्र पाेलीस महासंचालनालयात आयाेजित हुतात्मा दालन उद्घाटन व काॅफी टेबल बुक प्रकाशनप्रसंगी ते बाेलत हाेते. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पाेलीस महासंचालक सुबाेध जयस्वाल यांच्यासह पाेलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते.पाेलिसांची कामे नागरिकांपर्यंत पाेहाेचणे आवश्यक आहे. त्यासाठी अशा हुतात्मा दालनाची संकल्पना मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी, तसेच राज्यात सर्वत्र राबवण्यात यावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. अतुल्य हिंमत हे युक्ती आणि प्रसंगी शक्तीचा वापर करून पाेलिसांनी काेराेना काळात केलेल्या कामगिरीचा सचित्र दस्तावेज आहे.हे पुस्तक अप्रतिम झाले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी काैतुक केले. तसेच, या पुस्तकाच्या निर्मितीबाबत पाेलीस महासंचालकांचे अभिनंदन केले.या काॅफीटेबल बुकमुळे पाेलिसांच्या कार्यपद्धतीचे नेमके दर्शन दस्तावेज म्हणून राहील. विविध कल्पना आणि तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करून पाेलिसांनी काेराेना काळात केलेले काम या पुस्तकरुपाने जतन केले जाईल, असे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले. 26/11च्या दहशतवादी हल्ल्याला एक तप पूर्ण झाले. त्यानिमित्त राज्यात उभारण्यात आलेले हे हुतात्मा दालन सर्वसामान्य नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध असावे, अशी सूचनाही त्यांनी केली. पाेलीस महासंचालक सुबाेध जयस्वाल यांनीही यावेळी मनाेगत व्यक्त केले.प्रारंभी शहीदांचे कुटुंबीय विनिता अशाेक कामटे, स्मिता विजय साळसकर, तारा ओंबळे, मानसी शिंदे, तसेच जिजाबाई आलम यांच्या हस्ते हुतात्मा दालनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर शहीद झालेल्या पाेलीस अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा वेध घेणारा लघुपट दाखवण्यात आला.