लडाखमध्ये सर्वांत माेठा ऊर्जा प्रकल्प

    30-Nov-2020
Total Views |
मेक इन इंडिया याेजनेअंतर्गत प्रकल्पाची उभारणी
 
nmu_1  H x W: 0
 
लेह, 29 नाेव्हेंबर (वि.प्र.) : केंद्रशासित प्रदेश लडाखची राजधानी लेह येथे केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया याेजनेअंतर्गत देशातील सर्वांत माेठा ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यात साैर ऊर्जा, जलविद्युत, पवनऊर्जा आणि महासागर ऊर्जा सहित सबस्टेनेबल एनर्जी निर्माण करण्यात येणार आहे. हा प्रकल्प ‘प्राेव्हिजन ऑफ साेलर ाेटाे व्हाॅल्टेड पाॅवर प्लान्ट 1.5 एम डब्ल्यु’ या नावाने ओळखला जाणार आहे.हा महत्वाकांक्षी प्रकल्प 31 मार्च 2020 पर्यंत पूर्ण करण्यात येणार हाेता.पण आता 9 महिने अगाेदरच हा प्लांट तयार झाल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. वेस्टर्न एअर कमांडचे कमांडर इन चीफ मार्शल व्ही.आर. चाैधरी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटन झाले आहे.चीन व पाकिस्तान सीमेलगतच्या केंद्रशासित लडाख राज्याची राजधानी लेह ते मुंबई ही स्पाईस जेटची गुरुवार 26 नाेव्हेंबर 2020 पासून मालवाहतूक सेवा सुरू झाली आहे. स्पाइस जेट देशाची पहिली घरगुती विमान सेवा आहे. या लगेज फ्लाइट्चा क्रमांक एसजी 7370 आहे. या विमानाची पहिली मालवाहतूक खेप 13 टनाची हाेती.स्पाइस जेटचे हे मालवाहतूक विमान एसजी 7370 दिल्ली विमान तळावरून सकाळी 09.05 वा. रवाना झाले व 1 तास 35 मिनिटात लेह विमानतळावर उतरले. या मालवाहक विमानात अत्यावश्यक वस्तु तसेच लेहचे लाेक आणि मालवाहतुकीला आता सुरुवात झाली आहे. सडक परिवहना द्वारे लेहपर्यंत पाेहाेचणे खराब हवामानामुळे बऱ्याच वेळा अशक्य हाेत असते. परंतु स्पाइस जेटच्या फ्लाइटमुळे ही समस्या उद्भवणार नाही.