एशियाटिक साेसायटी ग्रंथालयाच्या पुनरुज्जीवनाची गरज : राज्यपाल

    30-Nov-2020
Total Views |
 
nhju_1  H x W:
 
मुंबई, 29 नाेव्हेंबर (आ.प्र.) : एशियाटिक साेसायटीला एकेकाळी वैभव प्राप्त हाेते.आज हा पुस्तकांचा अनमाेल खजिना दुर्लक्षित हाेताना दिसताे आहे. हा खजिना जतन करण्यासाठी एशियाटिक ग्रंथालयाचे पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे. त्यासाठी आराखडा तयार करावा, अशा सूचना राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांनी येथे दिल्या. एशियाटिक साेसायटी ऑफ मुंबईचा 216वा वर्धापन दिन राज्यपालांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी व्हाइस अ‍ॅडमिरल अजित कुमार, साेसायटीचे विश्वस्त अनिल काकाेडकर, अध्यक्ष प्रा. विस्पी बालपाेरिया आणि साेसायटीचे सदस्य उपस्थित हाेते. या ग्रंथालयात एक लाखापेक्षा जास्त पुस्तके आहेत. त्यापैकी 15 हजार दुर्मीळ आणि माैल्यवान असून प्राचीन, आधुनिक भारतीय आणि युराेपिय भाषांतील विविध पुस्तकांचा त्यात समावेश आहे. ऐतिहासिक ठेवा असलेली ही संस्था संपूर्ण जगातील लाेकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनली पाहिजे. साेसायटीला डिजिटायझेशन आणि जुन्या दस्तावेजांच्या जतनासाठी यापूर्वी 15 लाखांचा निधी देण्याची घाेषणा केली आहे. याव्यतिरिक्त अधिकच्या निधीची आवश्यकता असल्यास त्याचीही उपलब्धता करून देण्याचे आश्वासन राज्यपालांनी दिले. यावेळी राज्यपालांनी साेसायटीच्या ग्रंथांची पाहणी केली.