औरंगाबाद विभागात यंदा काेराेनामुळे राज्य करविभागाला बसला फटका

    30-Nov-2020
Total Views |
 
mju_1  H x W: 0
 
औरंगाबाद, 29 नाेव्हेंबर (आ.प्र.) : लाॅकडाऊन, काेराेनाचा माेठा फटका राज्य कर विभागाला (सीजीएसटी) बसला आहे. गेल्या सहा महिन्यांत औरंगाबाद विभागात केवळ 526 काेटी 49 लाखांचा महसूल जीएसटीच्या रूपाने प्राप्त झाला आहे. गेल्या वर्षी याचकाळात 1040 काेटी 24 लाखांचे करसंकलन झाले हाेते.एसजीएसटीच्या येथील कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना व बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे. विभागातील करदात्यांची संख्या सुमारे 37 हजार आहे. काेराेनामुळे सर्वच क्षेत्रांवर माेठा परिणाम झाला आहे. लाॅकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता औद्याेगिक क्षेत्र, बाजारपेठा बंदच हाेत्या. अनलाॅकनंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असली तरी गेल्या सहा महिन्यांत एकूणच उलाढाल थंडावल्याचे राज्य जीएसटी विभागाच्या कर संकलनावरून स्पष्ट हाेत आहे.दरम्यान, जीएसटीतून मिळणाऱ्या महसुलात घट झाल्याने करचाेरी राेखण्यासाठी विवरणपत्र (रिटर्न) न भरणाऱ्यांच्या नाड्या आवळण्यास सुरुवात करण्यात आली आहे.