नात्यात चुकीला माफ करा

    30-Nov-2020
Total Views |
एखादी गाेष्ट बदलायची आहे तर तुमचा अ‍ॅटिट्यूड कसा आहे हे महत्त्वाचे असते. तुमचा अ‍ॅटिट्यूड सकारात्मक असेल तर गाेष्टीही तशाच हाेतील.
 
m.1,2f2k,_1  H
 
नातं टिकण्यासाठी विश्वास महत्त्वाचा असताे. विश्वासाच्या आधारावर नाते उभे असते. एकदा हा विश्वास गमावला की पुन्हा ताे निर्माण करणे कठीण असते. जाेडीदाराचा विश्वास पुन्हा संपादन करणे खूप कठीण असते. मात्र आयुष्यातील या कटू अनुभवातूनच तर आपण शिकत जाताे ना. एकदा विश्वास गमावला की पुन्हा ताे मिळवणे साेपे आहे का? जगात अशक्य असे काहीच नसते. त्यामुळे तुमच्या नात्यातही जर असे काही झाले असेल तर जाेडीदाराचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी खाली दिलेल्या टिप्स वापरा. जाेडीदाराने आपली चूक मान्य केल्यानंतर तुम्ही एकमेकांशी माेकळेपणाने बाेला. त्याच्या अथवा तिच्या चुकीने तुम्हाला किती त्रास झाला हे त्याला सांगा.यामुळे नात्यात कटूता राहणार नाही. तसेच हे संभाषण एकमेकांवर आराेप-प्रत्याराेपांवर येऊन थांबणार नाही याची काळजी घ्या.चूक ही प्रत्येकाकडून हाेते त्यामुळे माफ करायला शिका. स्वत:ला आणि जाेडीदाराला झालेल्या चुकीबद्दल माफ करा. चूक केल्यानंतर मान्य करणाऱ्यापेक्षा ती चूक माफ करणारा माेठा असताे. जर तुम्ही जाेडीदाराला माफ केले नाही तर तुमच्यामध्ये एक अपारदर्शक भिंत निर्माण हाेत जाते, जी कधीच दूर हाेत नाही. चांगल्या नात्यासाठी अनेकदा अपेक्षा साेडाव्या लागतात.जाेडीदाराकडून अपेक्षा जरूर ठेवा मात्र त्या पूर्ण झाल्या नाहीत तर त्याचा परिणाम नात्यावर हाेऊ देऊ नका. त्यामुळे असं म्हणतात, की अपेक्षा न ठेवता बांधलेले नाते हे नेहमीच चांगले. यामुळे नात्यात काेणतीच कटुता येत नाही. तुटलेले नाते पुन्हा जाेडणे तितके सहजासहजी शक्य नसते. त्यामुळे आधी स्वत:मध्ये बदल करा आणि त्यानंतर नात्यातून बदलाची अपेक्षा करा. सतत त्याच त्याच गाेष्टींचा विचार करत बसू नका.असे केल्याने जखमेवरची खपली सतत निघत राहील आणि जखम बरीच हाेणार नाही. वेळ ही सर्व समस्यांवर उपयाेगी ठरते.प्रत्येक गाेष्टीला नीट हाेण्यासाठी वेळ द्या. घाई करू नका. प्रत्येक गाेष्टीला पुरेसा वेळ देणे तितकेच गरजेचे असते.