विद्यार्थी सुचवू शकणार पर्यावरण संवर्धनाचे विविध उपाय

30 Nov 2020 11:58:17
शाळा व महाविद्यालयांसाठी प्राेजेक्ट मुंबई आणि मंत्रालयाचा पर्यावरण 2.0 उपक्रम जाहीर
 
,lo_1  H x W: 0
 
मुंबई, 29 नाेव्हेंबर (आ.प्र.) : पर्यावरण संवर्धनासाठी विना-नफा तत्त्वावर कार्यरत असणाऱ्या प्राेजेक्ट मुंबई आणि महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण व हवामानातील बदल मंत्रालयाचा एन्व्हाॅयर्नमेंट (पर्यावरण) 2.0-जेन नेक्स्ट: लँड, वाॅटर, एअर हा उपक्रम जाहीर झाला असून, या उपक्रमात आयडियाज फाॅर अ‍ॅक्शन या निबंध स्पर्धेद्वारे शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे उपाय सूचवण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमात सहभागी हाेण्याचे आवाहन पर्यावरण व हवामानातील बदल मंत्रालयाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी केले आहे.महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण व हवामानातील बदल खात्याने नागरिकांना हवामानातील बदल व पर्यावरणीय समस्यांविषयी जागरुक करण्यासाठी, तसेच पर्यावरणात सुधारणा करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यास प्राेत्साहन देण्यासाठी माझी वसुंधरा अभियान उपक्रम हाती घेतला आहे. या खात्याने राज्याच्या शाश्वत विकासाच्या उद्देशाने हाती घेतलेला हा भूमी (पृथ्वी), जल (पाणी), वायू (हवा), अग्नी (ऊर्जा) व आकाश (सुधारणा) या पंचमहाभूतांवर आधारित असणारा देशातील पहिला विशेष उपक्रम आहे.पर्यावरणविषयक प्रश्नांबाबत तरुण पिढी उत्साहाने, बांधिलकीने व पुढाकाराने उपाय सूचवते. आमचे उपक्रम व याेजनांत सर्व वयाेगटांना सहभागी करून घेत आहाेत, असे म्हैसकर यांनी सांगितले.
ही निबंध स्पर्धा उच्च माध्यमिक शाळांसाठी (14 ते 17 वर्षे) आणि कनिष्ठ महाविद्यालयांसाठी (17 ते 21 वर्षे) खुली आहे.शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्थांद्वारे सादर करण्यात आलेल्या व प्रमाणित असलेल्या प्रवेशिका environmentprojectmumbai.org ई-मेलवर स्वीकारल्या जातील. प्रवेशिका मराठी, हिंदी किंवा इंग्रजीत पाठवाव्यात. प्रवेशिकांसाठी अंतिम मुदत 20 डिसेंबर ही आहे. या उपक्रमाविषयी अधिक माहितीसाठी सारिका चव्हाण (9821906665), दीप्ती जैन (9987812223) आणि रुपाली गाेहील (9869354342) यांच्याशी संपर्क साधावा.
Powered By Sangraha 9.0