महावितरणच्या कामगार संघटना बिल भरण्यासाठी राबवणार माेहीम

30 Nov 2020 11:38:18

,.m_1  H x W: 0 
 
पिंपरी , 29 नाेव्हेंबर (आ.प्र.) : वीजबिल थकबाकी वाढल्याने महावितरणसमाेर आर्थिक अडचण उभी राहिली आहे. ग्राहकांनी वीजबिल भरावे, यासाठी कामगार संघटना मदतीला धावल्या आहेत. त्यांनी आपले महावितरण आपली जबाबदारी या संकल्पनेंतर्गत प्रचारमाेहीम हाती घेतली आहे. लाॅकडाऊननंतर वीजबिलाच्या थकबाकीचा डाेंगर महावितरणसमाेर उभा राहिला आहे.लाॅकडाऊन काळात एकदाही बिल न भरलेल्या ग्राहकांची संख्या 64 लाख 52 हजार इतकी आहे. त्यामुळे दैनंदिन संचलन करण्यातही महावितरणला अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने वीजबिल भरणा माेहीम हाती घेतली आहे.महावितरणने अखंडित सेवा दिल्यानेच घरून काम करणे नागरिकांना शक्य झाले आहे. काेराेना काळात सेवा देताना अनेक विद्युत कर्मचारी मृत्युमुखी पडले. मात्र, त्यानंतरही सेवेत खंड पडला नाही. निसर्ग चक्रीवादळामुळे वीजयंत्रणा काेलमडली. तेव्हाही वीज कर्मचारी आपल्या गावापासून दूर अंतरावर वीजसेवा सुरळीत करण्यासाठी झटत हाेते. वीज कर्मचाऱ्यांच्या कार्याचा सन्मान करून नियमित वीज भरण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.काेराेना काळात नागरिकांना केबल, टीव्ही, माेबाइल, पेट्राेल-डिझेल, गॅस सिलिंडर माेफत मिळाला का? मग वीज माेफत मिळेल, अशा प्रचाराला बळी का पडता, असा सवालही या संघटनेने उपस्थित केला आहे. तसेच, काेराेना काळातही चाेवीस तास वीज उपलब्ध करून देणाऱ्या महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
Powered By Sangraha 9.0