मुलाने मागवले ऑनलाइन साडेपाच हजारांचे जेवण

    30-Nov-2020
Total Views |
 
mju_1  H x W: 0
 
हाॅटेलमधून ऑनलाइन जेवण मागवणे ही आता सामान्य गाेष्ट झाली आहे. इतकी की एखाद्या छाेट्या मुलाच्या हातात माेबाइल सापडला, तरी ताे असे जेवण मागवू शकताे. त्यातून लहान मुलांच्या हाती माेबाइल सापडल्यानंतर ते काय करतील, याचा नेम नसताे. साेशल मीडियावर अनेकदा अशा घटना पाहायला मिळतात.अशीच एक घटना सध्या साेशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ब्राझीलमधील एका मुलाने त्याच्या आई-वडिलांना धडकी भरेल, अशी एक ऑनलाइन ऑर्डर दिली आहे.त्याने आपल्या आईच्या माेबाइलवरून चक्क साडेपाच हजार रुपयांचे जेवण मागवले.आईचा माेबाइल चुकून मुलाच्या हातात सापडला आणि त्याने मॅकडाेनाल्डमध्ये फाेन करुन साडेपाच हजार रुपयांची ऑर्डर देऊन टाकली. मुलाच्या आईने इन्स्टाग्रामवर आपल्या मुलासह त्या ऑर्डरमधून आलेल्या खाण्याचाही फाेटाे शेअर केला आहे. हा फाेटाे साेशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फाेटाेमध्ये मुलगा ऑर्डर केलेल्या जेवणासह बसलेला दिसत आहे. अर्थात, असे काही पहिल्यांदाच घडत नाहीये, अशी ओळ या मुलाच्या आईने फाेटाेसह लिहिली आहे. इतकेच नाही, तर मुलाने नेमके काय काय मागवले याची यादीच आईने फाेटाेसह दिली आहे. गंमत म्हणजे, ही ऑर्डर पाहून मी हसले, रडले आणि नंतर त्याच्या शेजारी बसून जेवणाचा आनंद घेतला, अशी भावनाही शेअर केली आहे.मुलाच्या या खाण्याची ही पाेस्ट साेशल मीडियावर व्हायरल झाली असून, या पाेस्टला एक लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. मुलाचा हा निरागसपणा पाहून नेटकरी या मुलाच्या प्रेमात पडले आहेत, तर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.