सिडकाेत संविधान दिन उत्साहात साजरा

    30-Nov-2020
Total Views |
 
mnju_1  H x W:
 
नवी मुंबई, 29 नाेव्हेंबर (आ.प्र.) : केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार सिडकाेत संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी सिडकाे व्यवस्थापनातील अधिकारी, सर्व विभागप्रमुख, तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित हाेते. संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आला. सध्या सुरू असलेल्या काेराेनाच्या पार्श्वभूमीवर याेग्य ती काळजी घेऊन संविधान दिन थाेडक्यात व कमीत कमी उपस्थितांत साजरा करण्यात आला.