नवे तंत्रज्ञान : ओल्या कपड्यांनी करा माेबाईल चार्ज

    30-Nov-2020
Total Views |
ओल्या कपड्यांतून वीज निर्माण करून वैद्यकीय उपकरणे आणि माेबाइल फाेनची बॅटरी चार्ज करायची.त्यासाठी दास यांनी एका उपकरणाची निर्मिती केली आहे.
 
m,kki_1  H x W:
 
आपण आपल्या माेबाइल फाेनवर सतत नवनवी अ‍ॅप्स डाऊनलाेड करीत असताे.त्यामुळे माेबाइलची बॅटरी लवकर उतरते.याचा परिणाम म्हणजे बॅटरी सतत चार्ज करावी लागते. यामुळे विजेचे बिलही जास्त येते. पण आता माेबाइल फाेनची बॅटरी चार्ज करण्यासाठी एक गाेष्ट करा. ती म्हणजे, ओल्या कपड्यांनी चार्ज करा.त्रिपुरामधील शंख शुभ्र दास या इंजिनिअरने एक नवे तंत्रज्ञान शाेधून काढले आहे. ते म्हणजे, ओल्या कपड्यांतून वीज निर्माण करून वैद्यकीय उपकरणे आणि माेबाइल फाेनची बॅटरी चार्ज करायची.त्यासाठी दास यांनी एका उपकरणाची निर्मिती केली असून, पाण्याची वाफ हाेण्याच्या प्रक्रियेवर ते अवलबूंन असते. त्यासाठी त्यांनी कापड एका विशिष्ट आकारात कापले आणि अर्धी बादली पाण्यात एक प्लॅस्टिकचा स्ट्राॅ घालून ठेवला. या स्ट्राॅच्या दाेन्ही बाजूला त्यांनी तांब्याचे इलेक्ट्राेड्स जाेडले.कॅपिलरी अ‍ॅक्शनमुळे काही वेळाने पाण्याच्या वरच्या बाजूने वहन हाेते आणि सुमारे 700 मिलिव्हाेल्ट्स विजेची व्हाेल्टमीटरमध्ये नाेंद झाली. दास आणि त्यांच्या गटाने विजेचे उत्पादन वाढवण्यासाठी अशा प्रकारच्या 30 ते 40 उपकरणांचा वापर केला. दास यांनी दिलेल्या माहितीनुसार माेबाइल फाेन, मायक्राेचिप्स, मिनी गॅजेट, मेडिकल डायग्नाेस्टिक किट आणि अगदी लेडचा लहान बल्ब चार्ज करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या 12 व्हाेल्टचे उत्पादन त्यातून हाेते.दरम्यान, दास यांना ‘गांधीयन यंग टेक्नाॅलाॅजी इनाेव्हेशन’ (जीवायटीआय) हे पारिताेषिक देऊन नुकतेच गाैरवण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री डाॅ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते त्यांनी हे पारिताेषिक स्वीकारले.