इमारतीच्या छतावर चढलेली कार

30 Nov 2020 11:51:28
 
न्म्जू._1  H x
 
बरेच लाेक छंद म्हणून काही तरी वेगळेच करतात आणि त्यांची कल्पना साेशल मीडियावर व्हायरल हाेऊन लाेकप्रिय हाेते.असाच एक प्रकार बिहारमध्ये घडला.बिहारमधील एका इसमाने तीन मजली इमारत बांधली व त्यावर कारसारखी दिसणारी पाण्याची टाकी बांधली. ही कारच्या आकाराच्या पाण्याची टाकी, इमारतीवर कार चढल्याप्रमाणे वाटते.यासाठी त्या इसमाने अडीच लाख रु. खर्च केले. आनंद महिंद्रा यांनी कारच्या आकाराच्या पाण्याच्या टाकीचा फोटाे साेशल मीडियावर शेयर केला. अनेक लाेकांनी या उपक्रमाची प्रशंसा केली आहे. तिसऱ्या मजल्याच्या छतावर ही कारच्या आकाराची पाण्याची टाकी आहे.या पाण्याच्या टाकीची ही अप्रतिम कल्पना इंतसार यांच्या पत्नीची आहे .
Powered By Sangraha 9.0