दर दहामागे चार जणांची मानसिक आजारांशी झुंज

30 Nov 2020 11:40:28
ब्रिटनमध्ये झालेल्या ‘टाइम टू चेंज’ पाहणी माेहिमेत निघालेला निष्कर्ष 
 
nbhy_1  H x W:
 
नवी दिल्ली, 29 नाेव्हेंबर (वि.प्र.) : काेराेना महामारीचा गंभीर परिणाम मानसिक आराेग्यावर झाला असून, दर दहामागे चार पुरुष त्याच्याबराेबर झुंजत आहेत. ब्रिटनमधील ‘टाइम टू चेंज’ या पाहणी माेहिमेचा हा निष्कर्ष आहे.काेराेना महामारीचा फटका ब्रिटनसह बहुतेक युराेपीय देशांना बसला असून, त्याचा मानसिकेतवर काय परिणाम झाला, याची पाहणी करण्यासाठी ही माेहीम हाती घेण्यात आली हाेती. त्यात 1,500 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले.आपल्याबराेबर बाेलण्यासाठी काेणीही नसल्याची खंत दहापैकी चार पुरुषांना वाटत असल्याचे यात दिसले. ब्रिटनमधील 45 टक्के पुरुष गेले सहा महिने मानसिक आराेग्याच्या समस्येबराेबर सामना करत आहेत, तर मित्रांबराेबर समाेरासमाेर बाेलण्याची संधी मिळत नसल्याचे दु:ख 44 टक्के लाेकांना वाटत असल्याचे पाहणीतून समजले. आपले मित्र मानसिक तणावाबराेबर झुंजत असतानाही आपण त्यांना मदत करू शकत नसल्याबद्दल 44 टक्के लाेकांना खेद वाटताे.
Powered By Sangraha 9.0