बेकरी उद्याेगाला आले काेराेनामुळे ‘अच्छे दिन’

30 Nov 2020 11:48:26
 
nmju_1  H x W:
 
नवी दिल्ली, 29 नाेव्हेंबर (वि.प्र.) : काेराेना महामारीमुळे अनेक उद्याेगव्यवसाय अडचणीत आले असताना बेकरीक्षेत्राला मात्र ‘अच्छे दिन’ आले आहेत. बेकरी उत्पादनांना मागणी वाढत असल्याचा हा परिणाम असल्याचे अभ्यासकांना वाटते.बेकरी व्यवसाय अन्ननिर्मितीच्या क्षेत्रात येताे. बेकरी उत्पादनांना मागणी वाढत असल्याचे दिसल्यामुळे माेठ्या कंपन्या आता पॅकेज्ड केकच्या क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहेत.या क्षेत्रात वार्षिक उलाढाल 2,500 काेटी रुपयांपर्यंत जाण्याची श्नयता असून, ‘माँडलेज’च्या ‘कॅडबरी’, ‘आयटीसी’च्या ‘सनफिस्ट’सह अनेक बड्या कंपन्या या क्षेत्रात उतरल्या आहेत. संसर्गाच्या भीतीमुळे लाेकांचे बाहेर पडण्याचे कमी झालेले प्रमाण, घरीच खाद्यपदार्थ मागविण्याची झालेली साेय, तसेच नावीन्याची आवड यामुळे माेठ्या कंपन्या या क्षेत्रात येत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0