सिरम इन्स्टिट्यूटच्या काेराेना लशीचा पंतप्रधानांकडून आढावा

    30-Nov-2020
Total Views |
 
nmju_1  H x W:
 
पुणे, 29 नाेव्हेंबर (आ.प्र.) : जगातील सर्वांत माेठी लसनिर्मिती करणारी कंपनी असलेल्या सिरम इन्स्टिट्यूटला पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी भेट देऊन तेथील वैज्ञानिकांशी काेराेना लशीबाबत चर्चा केली, तसेच त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतली. येत्या दाेन आठवड्यांत सिरम इन्स्टिट्यूट केंद्र सरकारकडे तातडीच्या परवान्यासाठी अर्ज करणार असल्याची माहिती सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी दिली.अहमदाबाद व हैदराबादमधील प्रयाेगशाळांच्या पाहणीनंतर पंतप्रधान पुण्यात सिरममध्ये आले. आदर पूनावाला यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. यावेळी सिरमचे मुख्य कार्यकारी संचालक डाॅ.सायरस पूनावाला, कार्यकारी संचालक नताशा पूनावाला, शास्त्रज्ञ, तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते.ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने विकसित केलेल्या काेराेना प्रतिबंधक लशीची निर्मिती सिरम करत आहे. या लशीच्या उत्पादन प्रक्रियेचा पंतप्रधानांनी आढावा घेतला.येत्या दाेन आठवड्यांत सिरम केंद्राकडे तातडीच्या परवान्यासाठी अर्ज करणार आहे.या लशीचं वितरण प्रारंभी देशातच केले जाईल. त्यानंतर काेव्हॅक्स देश म्हणजेच आफ्रिकी देशांत तिचे वितरण केले जाईल, असे आदर पूनावाला यांनी सांगितले.