वृषभ

    29-Nov-2020
Total Views |
या आठवड्यात तुम्ही तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वास मिळवू शकता. तसेच इतरांनाही प्रभावित करू शकता. तुमच्यासाठी व्यापाराच्या नव्या संधी चालून येतील.या काळत तुम्ही काम पूर्ण करण्यासाठी तुमच्या सर्वांत प्रभावी पद्धतींचा वापर कराल.
तुम्ही वर्तनाद्वारे लाेकांच्या मनात जागा मिळवाल.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्राेफेशनल बाबींवर लक्ष केंद्रित करून पुढे जाल. तुमचा व्यापही वाढेल, पण एकूणच त्यातून फायदा दिसत असल्यामुळे तुम्हाला वैषम्य वाटणार नाही. नाेकरदारांना काैशल्य दाखवून उच्चपद मिळवण्याची संधी मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुम्ही खूप उत्साही राहाल. याचा सकारात्मक परिणामही तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही तुमच्या खास व्यक्तींना बाेलण्याच्या प्रभावाने उत्तम प्रकारे आकर्षित करू शकता. विवाहासंबंधित निर्णय घेण्यासाठी सुरुवातीचा व अखेरचा काळ उत्तम असेल पण मधला काळ कटाक्षाने टाळावा.
 
आराेग्य : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आराेग्याकडे जरा जास्त लक्ष द्यावे लागेल. कारण ग्रह तुमच्या आराेग्याला पूर्ण साथ देत नाहीत. विशेषकरून जिभेचे चाेचले जास्त पुरवल्यामुळे तुम्हाला पाेटाची समस्या हाेऊ शकते. याशिवाय कामाचा ताण जास्त घेतल्यामुळे तुम्हाला खूप सुस्ती व थकवा जाणवेल.
 
शुभदिन : 02, 03, 05,
 
शुभरंग : भुरा, हिरवा, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात तुमची आर्थिक फसवणूक हाेण्याची शक्यता  असल्यामुळे माेठी गुंतवणूक करणे टाळा व सावध राहा.
 
उपाय : मांगलिक दाेष दूर करण्यासाठी या आठवड्यात दर मंगळवारी वटवृक्षाला गाेड दूध वाहा. त्याने भिजलेल्या मातीचा कपाळावर टिळा लावा.