वृश्चिक

    29-Nov-2020
Total Views |
या आठवड्यात उत्तम याेजना बनवाल व लाभदायक गुंतवणूक कराल. भाैतिक लाभ तुम्हाला बळकट करील. त्यामुळे उत्तम जीवनशैली मिळेल व काैटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडू शकाल. प्रगतीसाठी प्रत्येक स्तरावर भविष्यासाठी लक्ष्य ठरवणे गरजेचे आहे.
सकारात्मक विचाराने उत्तम आराेग्य व सुख मिळवा.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात प्राेफेशनल आघाडीवर तुमच्यामध्ये उत्साह टिकून राहील. त्यामुळे पुढे जाऊ शकता. शेषकरून प्रिटिंग, औषध, मेडिकल, रसायन, रंग सरकारी व सत्ता पक्षाच्या कामात उत्तम प्रगती हाेऊ शकते.
 
नातीगाेती : या आठवड्यात प्रेमसंबंधाबाबत तुम्ही थाेडे लक्ष ठेवायला हवे.कारण एकमेकांच्या क्राेध व आवेशामुळे किरकाेळ गाेष्टीवरून तणाव निर्माण हाेऊ शकताे. विवाहितांना अहंकारामुळे संबंधात समस्या उद्भवू शकतात. तुमचा तुमच्या जाेडीदारावरील विश्वास कमी हाेताना दिसेल. परस्परांना पुरेसा वेळ द्या.
 
आराेग्य : या आठवड्यात एकूण पाहता तुमचे आराेग्य उत्तम राहणार आहे. तुम्हाला मानसिक स्वास्थ्य लाभेल. संततीसंबंधित चिंता दूर हाेईल. आठवड्यातील पहिल्या दाेन दिवसांत छातीत जळजळ वा कफाची तक्रार राहील पण ती लवकरच नष्ट हाेईल.
 
शुभदिन : 28
 
शुभरंग : पिवळा, लाल, गुलाबी
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात इतरांच्या खासगी गाेष्टींत दखल देऊ नका. विशेषकरून पार्टनरबाबत लक्षात ठेवावे. पण असे नाही जे दक्षता बाळगून टाळता येणार नाही.
 
उपाय : या आठवड्यात घड्यांमध्ये पाणी भरून एखाद्या एकांत रूममध्ये ठेवा.दुसऱ्या दिवशी ज्या घड्यातील पाणी कमी हाेईल ते धान्याने भरून त्याची राेज पूजा करीत राहा. बाकीच्या घड्यांमधील पाणी घर, अंगण व शेत इ.त शिंपडा. अन्नपूर्णा देवी नेहमी प्रसन्न राहील.