तूळ

    29-Nov-2020
Total Views |
या आठवड्यात वैयक्तिक समस्या मानसिक शांती भंग करू शकते. एखाद्या सुंदर आठवणीमुळे तुमचा व तुमच्या जाेडीदारातील वाद मिटू शकताे. यासाठी जुन्या आठवणींना उजाळा द्या. मानसिक दडपण टाळण्यासाठी उत्तम वाचा.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात भागिदारीच्या कामात सध्या आपण उत्तमप्रकारे पुढे जाऊ शकाल. कदाचित नवा करार करावयाचा असेल तर त्यातही फायदा हाेऊ शकताे. तसा तुमचा भागीदार त्वरित निर्णय घेऊ शकताे. स्थावर संपत्ती वा शेतीवाडीसंबंधित काम करणाऱ्यांसाठी उत्तम काळ आहे.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या नात्यात परिपक्वता व घनिष्टता राहील, पण संबंध थाेडे संथपणे वाढत असल्याचे जाणवेल. पहिल्या दाेन दिवसांत तुम्ही कामात व्यस्त राहाल. नव्या मित्रांशी ओळख हाेईल, पण त्यांच्याशी मैत्री करताना दक्षता बाळगा. अखेरच्या काळात अपेक्षेपेक्षा सुख कमी राहील.
 
आराेग्य : या आठवड्यात तुम्हाला तब्बेत टिकवून ठेवण्यासाठी नियमित जीवनशैली व संतुलित आहाराची सवय ठेवायला हवी. स्वभावात आवेश व क्राेध वाढल्यास मन अस्वस्थ राहील. नाक, कान, घशाच्या समस्या उद्भवू शकतात.
 
शुभदिन : 02, 03, 05
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात स्टाॅक मार्केटमध्ये पैसा गुंतवू नये.कारण ग्रहांची साथ नाही. आर्थिक व्यवहारात दक्षता बाळगावी.
 
उपाय : या आठवड्यात गणेश चाळीसा वा गणेश अष्टकाचा पाठ करून विड्याच्या पानावर दाेन लाडू ठेवून श्रीगणेशाला नैवेद्य दाखवून पाणी अर्पण करावे. धनसंबंधित चिंता निवारण्यासाठी प्रार्थना करून कापराने आरती करावी. धनासंबंधित चिंता दूर हाेईल