सिंह

    29-Nov-2020
Total Views |
या आठवड्यात गुंतवणूक आणि जमीन-जायदादीबाबत उपयुक्त निर्णय घेऊ शकाल.व्यापारी दृष्टीने एखादी शुभवार्ता मिळू शकते. अडलेली कामे पूर्ण हाेतील. स्वत:ची उपयुक्तता टिकवून ठेवावी. आर्थिक परिस्थितीमध्ये पूर्वीपेक्षा जास्त भक्कमपणा येईल.
स्वत:ची बिघडलेली दिनचर्या सुधारू शकाल.
 
नाेकरी/व्यवसाय : सध्याचा काळ प्राेफेशनल्सच्या तुलनेत नाेकरदारांसाठी उत्तम आहे. विशेषत: स्वत:च्या बुद्धी-काैशल्याने काही नवे कराल वा नव्या पद्धतीने काम पूर्ण कराल. त्याद्वारे भविष्यातील प्रगतीसाठी मार्ग तयार करण्याची श्नयता आहे. तरीही प्रतिस्पर्धी व हितशत्रूंपासून सावध राहावे.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुम्हाला नातेसंबंधात दुरावा असल्यासारखा जाणवेल.विवाहितांना जाेडीदाराकडून संबंधात कमी उत्साह मिळत असल्याचे जाणवेल.तुमच्यामध्ये अहंकाराचा मुद्दा वादाचे मुख्य कारण ठरू शकताे. विवाहेच्छुकांनी जाेडीदार निवडताना सध्या जास्त लक्ष द्यावे.
 
आराेग्य : या आठवड्यात अस्वस्थता, निद्रानाश वा थकव्यामुळे माेसमी बदलाचा परिणाम वेगाने वाढू शकताे. ज्यांना रक्ताभिसरणासंबंधित समस्या, अचानक दुखापत, स्नायूंमध्ये ताण अशा समस्या असतील त्यांनी सध्या उपचाराकडे जास्त लक्ष द्यावे.
 
शुभदिन : 01, 05, 06
 
शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात काही गाेष्टी ब्रेकअपपर्यंत पाेहाेचू शकतात. जर आपण संयमाने आणि शांतपणे वागाल तर आपण या परिस्थितींवर मात करू शकाल.
 
उपाय : या आठवड्यात राेज पाच माळा श्रद्धापूर्वक श्रीकृष्णाचे ध्यान करीत ‘ॐ क्लीं  नन्दादि गाेकुलत्राता दाता दारिद््रयभंजन। सर्वमंगलदाता च सर्वकाम प्रदायक:। श्रीकृष्णाय नम: ’ हा जप करीत राहावे. कृपाप्राप्ती हाेईल.