मिथुन

    29-Nov-2020
Total Views |
हा आठवडा सृजनात्मक कामे करणाऱ्या जातकांसाठी यशदायक ठरणार आहे. तुम्हाला प्रसिद्धी आणि कीर्ती लाभेल. काेणतेही काम करण्यासाठी तुमच्या जाेडीदारावर दबाव टाकू नका अन्यथा तुमच्यात दुरावा उत्पन्न हाेईल.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात नाेकरदार स्वत:च्या कल्पकतेने उत्तम प्रेझेंटेशन व नवे विचार स्वीकारून परफाॅर्मन्स सुधारू शकतील. हाती आलेले काम पूर्ण करण्यासाठी थाेडे श्रम करावे लागतील कारण तुमच्यातील कामाविषयीच्या निष्ठा व जाेमापेक्षा तुम्हाला तुमच्या टीमकडून कती सहकार्य मिळेल.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या नात्यांत ताळमेळ असेल तरीही आपसातील विश्वास टिकवण्यासाठी विशेष प्रयत्नही करावे लागतील. कदाचित तुम्हाला नात्यात तणाव येण्याची भीती सतत सतावीत राहील. जाेडीदार व तुम्ही एकमेकांना उत्तम साथ द्याल पण अखेरच्या दाेन दिवसांत तुम्ही एकटे राहू इच्छाल.
 
आराेग्य : या आठवड्यात त्वचेची समस्या, गुप्तराेग, अ‍ॅलर्जी, मज्जासंस्थेबाबत समस्या असल्यास सध्या यावरील उपचाराकडे जास्त लक्ष द्यावे. पाैष्टिक आहारावर भर द्याल तर काेणत्याही माेठ्या समस्येची श्नयता दिसत नाही.
 
शुभदिन : 02, 03, 05
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात काही अडचणी व नैराश्य आले तरी स्वत:ला कमजाेर समजू नका. स्वत:ची शक्ती ओळखाल तर नैराश्य येणार नाही व कार्यपूर्तीलाही विलंब लागणार नाही.
 
उपाय : या आठवड्यात रविवारी विड्याचे पान साेबत ठेवून जा. साेमवारी आरशात स्वत:ला पाहून जा. मंगळवारी मिष्टान्न खाऊन जा. बुधवारी काेथिंबिरीची पाने खाऊन जा. गुरुवारी माेहरी ताेंडात ठेवून जा. शुक्रवारी दही तर शनिवारी आले व तूप खाऊन जा. लाभ हाेईल.