मेष

    29-Nov-2020
Total Views |
या आठवड्यात तुमच्या वास्तववादी याेजना तुमची आर्थिक स्थिती उत्तम करू शकतात. तुमच्या स्वभाव अस्थिर हाेऊ देऊ नका. तुमच्या डाे्नयात कामाचे प्रेशर असूनही तुमची प्रिय माणसे तुमच्यासाठी आनंदाचे क्षण आणतील. नव्या याेजना लगेच अवलंबवू नका, तसेच अनावश्यक खर्च टाळा. कामासाठी केलेला प्रवास फायदेशीर ठरेल.
 
नाेकरी/व्यवसाय : हा आठवडा सर्व दृष्टींनी तुमच्या करियरसाठी फायदेशीर ठरणारा आहे. प्रत्येक निर्णय तुमच्या बाजुने हाेताना दिसेल. कामाबद्दलचा तुमचा प्रामाणिकपणा पाहून बाॅस व साेबत काम करणाऱ्यांकडून स्तुती हाेईल. बिझनेसमध्ये सध्या काेणतीही नवी गुंतवणूक करू नका.
 
नातीगाेती : अविवाहित जातकांसाठी हा आठवडा खूप महत्त्वाचा ठरणार आहे.तुम्हाला एखाद्या नव्या व्यक्तीला भेटण्याची संधी मिळणार आहे. जी भावी काळात एका नव्या नात्याचे रूप घेणार आहे. दांपत्यजीवनात समजुतदारपणे आपसातील निर्णय घ्याल तर परिणाम उत्तम हाेतील..
 
आराेग्य : या आठवड्यात पित्तासारख्या पाेटाच्या विकाराने त्रस्त हाेण्याची जास्त शक्यता  आहे. तसेच त्वचा व रक्तासंबंधितही समस्या उत्पन्न हाेऊ शकतात. या आठवड्यात तुम्ही जर तुमच्या तब्बेतीबाबत बेफिकीर राहू लागला तर ते तुमच्यासाठी घातक ठरण्याची शक्यता  आहे.
 
शुभदिन : 29, 30, 03 शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात व्यवसायात पैसा गुंतवताना थाेडी जास्त दक्षता बाळगा.कारण थाेडीशी चूकही तुमचे नुकसान करू शकते.
 
उपाय : या आठवड्यात एखाद्या अंध मुलाला वा मुलीला आपले मानून पुस्तकांचे दान करा वा कपडे व फी देऊन मदत करा.