मीन

    29-Nov-2020
Total Views |
या आठवड्यात वैयक्तिक बाबी नियंत्रणात घेत त्यांची व्यवस्था व उपाय सुनिश्चित करा. पारंपरिक बेड्यांमधून मुक्त हाेऊन आव्हाने व सत्य माेकळेपणाने स्वीकारण्याचे साहस तुमच्यामध्ये आहे. अनेकजण तुमच्याकडे आकर्षित हाेतील. तुम्ही तुमच्या ऊर्जे चा व वेळेचा सदुपयाेग करावा.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुमचे लक्ष कामकाजात राहील, पण स्वत:ची शक्ती व ऊर्जा याेग्य दिशेने न्या. कारण कामकाजात बदल करण्याची वेळ येऊ शकते.तसेच या आठवड्याच्या मधल्या काळात वाणीत नम्रता ठेवा. दूरच्या ठिकाणाच्या व मल्टीनॅशनल कंपनीच्या कामासाठी उत्तम काळ.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्यामध्ये खूप उत्तम आत्मियता असेल. तुम्ही एकमेकांना जास्त वेळ देऊ शकाल. तसेच दूर राहणाऱ्या प्रियपात्राशी कम्युनिकेशन वाढेल. प्रियपात्राशी बाेलताना वाणीत नम्रता बाळगा. अखेरच्या दिवशी प्रियपात्रासाेबत छाेटासा प्रवास कराल.
 
आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य उत्तम राहील, पण मधुमेहाच्या रुग्णांनी औषधासाेबतच पथ्यपाण्याकडेही जास्त लक्ष द्यावे. बदलत्या माेसमासाेबत विपरित आहार तुमच्या तब्बेतीवर जास्त परिणाम करील. आठवड्याच्या मध्यात मान वा खांदेदुखी, डाेळ्यांची जळजळ व दातांसंबंधित समस्या हाेऊ शकताे.
 
शुभदिन : 01, 04, 05
 
शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात कामावरून घरी परतताना रिकाम्या हातांनी घरी परतू नका.घरात मीठ कधीही उघड्यावर ठेवू नका.
 
उपाय : संध्याकाळी वा पूजेच्या वेळी पाहुणा वा एखादी सुवासिनी घरात येणे हे लक्ष्मीमाता घरात येत असल्याचे द्याेतक असते व शुभ मानले जाते.