मकर

    29-Nov-2020
Total Views |
या आठवड्यात तुम्ही काेणत्याही पैलूवर तडजाेड करण्यासाठी तयार हाेणार नाही.वैचारिक स्पष्टवक्तेमुळे खासगी संबंधातील खळबळ दूर हाेईल. तुम्ही लाेकांचे व परिस्थितीचे त्वरित व सटीक आकलन करण्यास समर्थ आहात, पण कामात व व्यवहारात आब राखून राहा. नाती प्रेमाने जाेपासण्याची गरज आहे.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात कामकाजात संथपणे पुढे जाल पण स्थितीत उत्तम स्थैर्य आणू शकाल. सेल्स व मार्केटिंगसह वाणीच्या प्रभावाच्या कामांमध्ये असणाऱ्या जातकांना प्रारंभी उत्तम प्रगती दिसून येईल.नातीगाेती : हा आठवडा तुमच्यासाठी अपार सुख घेऊन येणारा आहे.
 
दांपत्यजीवनात संततीसुखाची सुखद जाणीव हाेण्याचा याेग आहे. काैटुंबिक जीवन सुखमय असेल. गरज पडल्यास तुम्हाला तुमच्या जाेडीदाराकडून भावनिक आधार मिळेल. घरात सर्व प्रकारे आनंदाचे वातावरण राहणार आहे.
 
आराेग्य : या आठवड्यात तुमची तब्बेत सुखकर राहील. मानसिक स्वास्थ्यासाेबत तुमचे दैनंदिन जीवन उत्तम राहील. तुम्ही आध्यात्मिक बाबतीतही ध्यान केंद्रित कराल. मधल्या काळात डाेळ्यांत जळजळ, डाेकेदुखी, व उतावीळपणामुळे मार लागणे इ. समस्या वाढू शकतात.
 
शुभदिन : 02, 03, 05
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात काेणत्याही त्रासाला घाबरू नका. हसतमुख राहा.तुमच्या जीवनातील काही खास क्षण नात्यांना द्या..
 
उपाय : या आठवड्यात घरात एकदा मीठाच्या पाण्याने पाेछा करणे सुखशांतीला निमंत्रण देते व घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट हाेते.