कुंभ

    29-Nov-2020
Total Views |
या आठवड्यात कार्यस्थळावर गतिराेधकाचा अंत व स्वत:चा मार्ग सुकर करण्यात यशस्वी व्हाल. तुमचे आकर्षक व्यक्तिमत्व व संवादशैली काही महत्त्वाच्या लाेकांना स्वत:कडे आकर्षित करून घेण्यात यशस्वी हाेईल.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुम्ही बाैद्धिक प्रतिभेसाेबतच सृजनात्मकता हव्या असणाऱ्या प्राेफेशनल कामांमध्ये थाेडे मागे राहाल. यावर जास्त लक्ष देण्याची गरज असेल. मन थाेडे चंचल राहील. ज्यामुळे कामावर कमी लक्ष देऊ शकाल परंतु यानंतर तुमचा उत्साह वाढेल.
 
नातीगाेती : या आठवड्यात प्रेमसंबंधासाठी सुरुवातीचे दाेन दिवस तुम्हाल थाेडी प्रतिकूलता जाणवेल. तुमच्या जाेडीदारासंबंधित काेणती ना काेणती गाेष्ट तुम्हाला जास्त चिंताग्रस्त ठेवील. कदाचित खास मित्रांशी मतभेद हाेऊ शकतात. तुमचे संबंध टिकवण्यासाठी तुम्ही राग व आवेश साेडायला हवा.
 
आराेग्य : या आठवड्यात तुम्हाला शरीरात सुस्ती, आळस, निद्रानाश इ. तक्रारी हाेऊ शकतात. याशिवाय तुमच्यामध्ये आततायीपणा वाढलेला राहील व त्यामुळे अचानक दुखापत हाेण्याची श्नयता आहे. हे टाळण्यासाठी आततायीपणा साेडा.
 
शुभदिन : 02, 03, 05
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात स्वत:च्या बाेलण्यावर संयम ठेवा व काेणताही गैरसमज बाळगू नका. गाेंधळाच्या स्थितीत असल्यामुळे तुम्ही ठाम निर्णय घेऊ शकणार नाही.
 
उपाय : दर अमावस्येला संपूर्ण घराची सफाई करा व टाकावू वस्तू भंगारवाल्याला द्या. दर पाेर्णिमेला घरात वा मंदिरात हवन करणे अत्यंत शुभ असते. घरात लाेबानचा धूर अवश्य द्या.