कर्क

    29-Nov-2020
Total Views |
या आठवड्यात तुम्ही सामाजिक कार्याकडे जास्त लक्ष द्याल आणि गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न कराल. प्रेमाबाबत आपल्या बाेलण्यावर ताबा ठेवा. काेणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी दक्षता बाळगा. तुमचा जाेडीदार तुमच्यासाठी देवदूत आहे. त्याकडे पाहिल्यास तुम्हालाही हे पटेल.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुम्ही जन्मभूमीपासून दूरच्या कामासाेबत विदेशी कामातही उत्तम परफाॅर्मन्स द्याल. तुमचे मन कामकाजातच जास्त व्यस्त राहील. प्राेफेशनल आघाडीवर तुमच्यासाठी उत्तम काळ आहे. नाेकरदारांच्या बदलीची वा नव्या संधीची शक्यता  आहे.
 
नातीगाेती : या आठवड्यात खास व्यक्तीबाबत आकर्षण राहिल्यामुळे बहुतेक काळ राेमान्साची भावना प्रबळ राहील व प्रिय पात्रासाठी जास्त वेळ काढाल.कामाच्या व्यापामुळे प्रिय पात्राला जरी जास्त वेळ देऊ शकत नसला तरी अखेरच्या दाेन दिवसांत उत्तम साथ मिळाल्यामुळे संताेष अनुभवाल.
 
आराेग्य : या आठवड्यात माेसमी आजारांच्या तावडीत सापडण्याची शक्यता  आहे. पण चिंता करायची गरज नाही. नियमित आहार व पुरेशा विश्रांतीकडे लक्ष द्याल तर बहुतेक काळ तुमच्यामध्ये जाेम राहील.
 
शुभदिन : 29, 30, 03
 
शुभरंग : पिवळा, लाल, मरून
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात काेणताही निर्णय घेण्यापूर्वी व्यवस्थित विचार कराल तर परिस्थिती तुमच्या नियंत्रणात राहील. आवेशात काेणताही निर्णय घेऊ नका.
 
उपाय : या आठवड्यात एका हंडीत सव्वा किलाे हिरवे मूग, दुसरीत सव्वा किलाे खडे मीठ भरा व या दाेन्ही हंडी घरात ठेवा. हे काम बुधवारी करा. घरात पैसा येण्यास सुरुवात हाेईल.