कन्या

    29-Nov-2020
Total Views |
या आठवड्यात वैयक्तिक प्रकरणे नियंत्रणात राहतील. तुम्ही एखाद्या मुद्यावर बसून चर्चेद्वारे प्रकरण साेडवण्याची गरज आहे. जवळच्या व्यक्तींशी अनेक मतभेद उद्भवू शकतात. जर तुमच्या कुटुंबातील एखाद्याच्या तब्बेतीमुळे एखाद्याला भेटण्याची याेजना रद्द करावी लागली तर चिंता करू नका.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुम्हाला प्राेफेशनल आघाडीवर थाेडे लक्ष द्यावे लागेल कारण प्रतिस्पर्धी व शत्रू तुमची प्रतिष्ठा कमी करण्याचा प्रयत्न करतील.अशा स्थितीत तुम्ही तुमच्या काम वा प्राॅड्नटची गुणवत्ता सांगून साेबत कामाविषयी समर्पणाची भावना ठेवून स्थिती भक्कम करू शकता.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुम्ही नातेसंबंधातील सुख एकूण पाहता चांगल्याप्रकारे मिळवू शकाल, पण आठवड्याच्या मध्यात अस्वस्थतेमुळे नात्यांपासून दूर राखण्याचा प्रयत्न कराल. शक्यतो  नात्याची नवी सुरुवात करण्यासाठी हा काळ निवडू नये.
जाेडीदार व प्रियपात्राला जेवढे खूश ठेवाल तेवढी जवळीक वाढेल.
 
आराेग्य : या आठवड्यात माेसमी बदल तुमच्या तब्बेतीवर विपरित परिणाम करतील. एखादा आजार असल्यास त्याचा त्रास वाढू शकताे. छातीसंबंधित त्रासाच्या याेग्य निदानाअभावी उपचाराला उशीर लागू शकताे. स्थूलपणा, मधुमेह, अपचन, पाेटासंबंधित समस्या वाढू शकतात.
 
शुभदिन : 02, 03, 05
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात आर्थिक स्थिती अस्थिर राहील. पैसा हुशारीने खर्च करा.
 
उपाय : या आठवड्यात आर्थिक त्रासातून मुक्त हाेण्यासाठी श्रीगणेशाची नियमित आराधना करा. तसेच पांढऱ्या गुंजा एका बाटलीत गंगाजलात टाकून राेज श्रीसुक्ताचा पाठ करा. बुधवारी विशेष नैवेद्य दाखवून पूजा करा.