धनु

    29-Nov-2020
Total Views |
या आठवड्यात त्रिकाेणीय परिस्थिती बनू शकते. व्यावसायिक भागीदारीत यामुळे लाभ हाेईल. पण वैयक्तिक संबंधांत त्रास निर्माण हाेऊ शकताे. तीन वेगळ्या भूमिका पार पाडताना त्या वेगळ्या ठेवा. अन्यथा उलथापालथ वा गाेंधळाची स्थिती उत्पन्न हाेऊ शकते. भाैतिक व आर्थिक बाबतीत भाग्याची साथ असेल.
 
नाेकरी/व्यवसाय : धंद्या-व्यवसायाच्या विकासाच्या याेजना अमलात आणण्यासाठी पहिले दाेन दिवस तुम्ही सक्रिय राहाल. तुमच्यात नवा उद्याेग सुरू करण्याचा उत्साह व आत्मविश्वास राहील. तुम्ही भराभर नवे निर्णय घ्याल. तसे सरकारी व कायदेशीर प्रश्न त्यामध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्न करतील.
 
नातीगाेती : या आठवड्यात प्रेमसंबंधात तुम्ही वेगाने पुढे जाल. तुमच्यामध्ये प्रणयी भावना जास्त राहील. तुम्ही संबंधात स्थिर गतीने पुढे व्हाल पण प्रेम व्यक्त करण्यास जास्त वेळ लागू शकताे. जे पूर्वीपासून प्रेमसंबंधात असतील ते लग्नबंधनाचा निर्णय घेऊ शकतात. अखेरचे दाेन दिवस भेटीसाठी उत्तम असतील.
 
आराेग्य : या आठवड्यात तुम्ही फिटनेसबाबत थाेडी दक्षता बाळगायला हवी.ज्यांना ब्लडप्रेशर, बॅक पेन, हृदयाच्या ठाे्नयांत अनियमितपणाची समस्या असेल त्यांनी विशेष लक्ष ठेवायला हवे. तसेच प्रवासात जास्त धाडस करणे टाळावे अन्यथा अचानक दुखापत हाेऊ शकते.
 
शुभदिन : 01, 04, 05
 
शुभरंग : नाल
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात जाेडीदाराला काेणतेही खाेटे आश्वासन देऊ नये. अन्यथा येत्या काळात तुम्हाला त्रास हाेऊ शकताे.
 
उपाय : या आठवड्यात श्रीसूक्त व श्रीलक्ष्मीसूक्तपाचा पाठ राेज वा शुक्रवारी केल्यास लक्ष्मीमाता कायमची निवास करते.