करिअरमधील प्रगतीसाठी...

    28-Nov-2020
Total Views |
 
nmju_1  H x W:
 
करिअरमध्ये प्रगती करायची असेल तर फक्त स्वतःपुरते पाहून चालत नाही. सहकारी, टीममधील अन्य सदस्य आणि तुमच्या विभागाची एकंदरीत कामगिरी लक्षणीय व्हावी लागते. त्यासाठी करिअरमध्ये तुम्ही प्राप्त करीत असलेल्या नवनव्या गाेष्टी इतरांशी शेअर करा. तुमचे नवनवे प्रकल्प, उद्दिष्टे आणि कमावलेलं यश याद्वारे तुमच्या करिअरमधील वाटचाल आणि प्रगती यांचं माेजमाप हाेतं.तुम्ही बजावलेल्या कामगिरीचा तुमच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना लाभ हाेईल याकडे लक्ष द्या.तुमच्या याेगदानामुळे जर त्या क्षेत्रात काम करणाऱ्या इतरांना मदत हाेत असेल तर ते दखलपात्र ठरतं. उदा.जुन्या समस्येवर नव्या तंत्राचा उत्तर शाेधणे, विविध विभागातील खर्च कमी करण्याच्या कल्पना यातून कंपनीच्या उलाढालीत आणि नफ्यावर सकारात्मक परिणाम हाेत असताे. तुम्हाला भाेवतालचं जग बदलवणं शक्य नसतं. मात्र, भाेवतालच्या वातावरणाला प्रतिसाद कसा द्यायचा ते मात्र सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असतं. तुमचा प्रतिसाद म्हणजे तुमच्या व्यक्तिगत उन्नतीची संधी असते, हे लक्षात घ्या.जेव्हा तुम्हाला असुरक्षित वाटेल तेव्हा ती परिस्थिती म्हणजे तुमचा आत्मविश्वास आणि स्वातंत्र्य जपण्याची संधी आहे, असे माना. तुमच्या उत्पादनक्षमतेत वाढ करा. तुम्हाला जेव्हा खूप काही मिळवायचं असतं तेव्हा तुमच्या उत्पादनक्षमतेत आपाेआप वाढ हाेते. सलग काम केल्याने उत्पादनक्षमतेवर विपरीत परिणाम हाेताे. लहान ब्रेक तुमच्या शरीराला आणि मनाला ताजेतवाने करतात. अहंकाराला थारा न देता तुमच्या मनात डाेकावणाऱ्या शंका, प्रश्न हे वरिष्ठांना, जाणकारांना विचारा. प्रत्येक गाेष्टीवर तुमच्याकडे उत्तर तयार असणं अपेक्षित नाही, तर ते कसं शाेधता येईल हे माहीत असणं आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणं हे तुमच्याकडूनअपेक्षित असतं.