प्राणायाम, कपालभाती नियमित करा

    28-Nov-2020
Total Views |
फुप्फुसांची क्षमता, त्यांचा पद्धतशीरपणे केलेला विस्तार आणि वायू काेशांची लवचिकता या गाेष्टी वाढवण्यासाठी प्राणायाम अत्यंत महत्त्वाचा आहे.
 
m,k_1  H x W: 0
 
अनेकदा असे हाेतं की आपली सर्वांत जवळची गाेष्ट किंवा व्यक्तींना आपण गृहीत धरताे. केवळ लाेकांबाबत असे हाेते अशातला भाग नाही. अनेक शारीरिक क्रियांबाबतही आपले तसेच असते. उदा. नैसर्गिक, सर्वांत सहज हाेणारी श्वसनक्रिया सर्वाधिक दुर्लक्षित राहते. त्याकडे आपण फार कधी लक्षही देत नाही.श्वसनसंस्थेचे कार्य उत्तम चालणे फार गरजेचे असते.हठयाेगातील शुद्धिक्रिया, आसने, प्राणायाम केल्याने श्वसनसंस्थेचे आराेग्य उत्तम प्रकारे टिकवता येते.हठयाेगात सहा शुद्धिक्रिया सांगितल्या आहेत. त्यातील काही श्वसनकार्य सुधारण्यासाठी महत्त्वाच्या आहेत.नेतीक्रिया ही नासिका व सायनस स्वच्छ ठेवण्यास मदत करते. विविध अ‍ॅलर्जी हळूहळू कमी हाेऊ लागतात.तसेच वमन धाैतीदेखील अत्यंत लाभदायक शुद्धीक्रिया आहे. श्वसनमार्गातील अशुद्धी नाकातील वाढलेल्या स्रावांमार्गे शरीराबाहेर टाकली जाते. बस्तीमुळे पचनसंस्थेची संपूर्ण सफाई हाेते, त्यामुळे श्वासपटलाचे कार्य सुधारते. कपालभातीमुळे फुप्फुसातील घाण व दीर्घकाळ साचलेली अशुद्ध हवा बाहेर फेकली जाते आणि स्वच्छ हवा भरली जाते, जे नेहमीच्या श्वसनात हाेत नाही, तसेच छातीच्या स्नायूंचे प्रसरण व त्यांचा विस्तार करणारी आसने, जसे भुजंगासन, उष्ट्रासन, उत्तानमण्डुकासन इत्यादी नियमित केली पाहिजेत, तसेच छातीच्या मागच्या भागाचा विस्तार हाेताे त्यापुढे वाकून करण्याच्या आसनांनी, जसे पश्चिमाेत्तानासन, याेगमुद्रा इत्यादी. छातीच्या डाव्या व उजव्या बाजूसाठी काेनासन, अर्ध कटिचक्रासनासारखी आसने सरावात असावीत. पीळ देणारी आसने जसे त्रिकाेणासन, कटिचक्रासनदेखील खूप महत्त्वाची आहेत.श्वसनाच्या आराेग्यासाठी सर्वांत उपयाेगी काय असेल तर प्राणायाम! फुप्फुसांची क्षमता, त्यांचा पद्धतशीरपणे केलेला विस्तार आणि वायू काेशांची लवचिकता या गाेष्टी वाढवण्यासाठी प्राणायाम अत्यंत महत्त्वाचा आहे. मेंदूतील उत्तेजित केंद्रे शांत हाेण्यासाठी व स्ट्रेस कमी करण्यासाठी प्राणायामाचा अभ्यास अत्यंत प्रभावी ठरताे. यासाठी दीर्घश्वसन, उज्जयी, ओंकार, भ्रामरी यांचा नियमित सराव करावा.दिवसातील थाेडा तरी वेळ शुद्धिक्रिया, याेगासने, प्राणायाम, ध्यान यासाठी बाजूला काढावा.