पंतप्रधानांचे निवासस्थान आणि सुरक्षा

28 Nov 2020 12:16:15
 
,.ll_1  H x W:
 
सुरुवातीला पंतप्रधानांना राहण्यासाठी वेगळे निवासस्थान दिले जात नसे. खासदार म्हणून त्यांना मिळालेल्या निवासस्थानातच ते राहत असत.जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना तीन मूर्ती भवन याठिकाणी ते राहत असत. इंग्रजांच्या राजवटीत भारतीय लष्कराचे प्रमुख या ठिकाणी राहत असत.तीन मूर्ती भवनला त्या वेळी फ्लॅगस्टाफ हाऊस म्हटले जात असे. 1964 मध्ये नेहरूंचे निधन झाल्यानंतर तीन मूर्ती भवन याठिकाणी नेहरू स्मृती संग्रहालय आणि ग्रंथालय सुरू करण्यात आले.त्यांच्या नंतरचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री हे 10 जनपथ या ठिकाणी राहात असत. नंतरच्या पंतप्रधान इंदिरा गांधी 1 सफदरजंग मार्ग याठिकाणी वास्तव्याला हाेत्या.सध्याचे 7 लाेककल्याण मार्ग हे पंतप्रधानांचे निवासस्थान 12 एकरांवर वसलेले आहे. ते 1980 मध्ये बांधण्यात आले. राजीव गांधी, व्ही. पी. सिंग आणि त्या नंतरच्या सगळ्या पंतप्रधानांचे याठिकाणी वास्तव्य हाेते. पूर्वी पंतप्रधानांच्या निवासस्थानाला 7, रेसकाेर्स मार्ग असे नाव हाेते. नरेंद्र माेदी यांनी पंतप्रधान झाल्यावर ते बदलून 7, लाेककल्याण मार्ग असे केले.दिल्लीतील प्रतिष्ठित अशा ल्युटेन्स परिसरातील पाच बंगल्यांची जागा एकत्रित करून बारा एकर जागेवर पंतप्रधानांचे निवासस्थान उभे आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ही व्यवस्था करण्यात आली आहे.इथूनच पंतप्रधान बहुतेक सर्व कार्यालयीन कामकाज करतात. महत्त्वाच्या राजकीय आणि शासकीय बैठकादेखील याच ठिकाणी हाेत असतात. त्याठिकाणी असलेला एक बंगला गेस्ट हाऊस म्हणून वापरण्यात येताे, तर एक बंगला विशेष सुरक्षा पथकातील (एसपीजी) कमांडाेंसाठी राखून ठेवण्यात आला आहे. 7, लाेककल्याण मार्ग हे पंतप्रधानांचे निवासस्थान आहे. पंतप्रधानांचे कार्यालय रायसीना हिल येथील साऊथ ब्लाॅकमध्ये आहे.
Powered By Sangraha 9.0