राेजगाराच्या मागणीप्रमाणे तरुणांना प्रशिक्षित करावे

    27-Nov-2020
Total Views |
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना : ऑन जाॅब प्रशिक्षण याेजना राबवावी
 
mjki_1  H x W:
 
मुंबई, 26 नाेव्हेंबर (आ.प्र.) : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर अनेक तरुणांचे राेजगार गेले आहेत. या पार्श्वभूमीवर नव्याने राेजगाराच्या संधी निर्माण झाल्या असून, त्याप्रमाणे काैशल्य विकास, राेजगार व उद्याेजकता विभागाने नवीन मागणीप्रमाणे तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.वर्षा निवासस्थानी काैशल्य विकास, राेजगार व उद्याेजकता विभागाचे सादरीकरण झाले. त्यावेळी मुख्यमंत्री बाेलत हाेते. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजाेय महेता, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, काैशल्य विकास, राेजगार व उद्याेजकता विभागाच्या सचिव अंशु सिन्हा, काैशल्य विकास, राेजगार व उद्याेजकता आयु्नत दीपेंद्रसिंह कुशवाह उपस्थित हाेते.लाॅकडाऊननंतर निर्माण झालेल्या नवीन परिस्थितीत जसे राेजगार निर्माण हाेतील, त्याला अनुसरून प्रशिक्षित तयार करण्याचे काम विभागाने करावे. यासाठी सविस्तर कृती आराखडा लवकर तयार करण्यात यावा. तसेच, ऑन जाॅब प्रशिक्षण याेजना कार्यान्वित करावी. औद्याेगिक प्रशिक्षण संस्थांत (आयटीआय) नवीन अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रे सुरू करावीत. काैशल्य विद्यापीठ निर्माण करण्याबाबत विचार करावा. प्रत्येक जिल्ह्याच्या भाैगाेलिक रचनांनुसार, स्थानिक परिस्थितीनुसार राेजगार प्रशिक्षण केंद्रे सुरू करावीत.समृद्धी महामार्गालगतच्या जिल्ह्यांत नवीन राेजगार उपलब्ध हाेतील, त्याप्रमाणे प्रशिक्षित तयार करण्याचे नियाेजन करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
आयु्नतालयामार्फत भविष्यात राबवण्यात येणाऱ्या याेजनांचे दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी सादरीकरण केले.