मिरा-भाईंदर-दहिसर मेट्राेच्या कामाची पाहणी

    27-Nov-2020
Total Views |

1[-_1  H x W: 0
 
भाईंदर, 26 नाेव्हेंबर (आ.प्र.) : मिरा-भाईंदर-दहिसर मेट्राेच्या कामात येणारे अडथळे दूर करण्यासाठी व राष्ट्रीय महामार्गावर हाेणारी वाहतूककाेंडी टाळण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी अधिकाऱ्यांसाेबत मेट्राेच्या कामाची पाहणी केली. दहिसर चेक नाका येथील टाेलनाक्यामुळे वाहतूककाेंडी वाढत असल्याने नाका स्थलांतरित करण्याची मागणी विचारे यांनी एमएमआरडीएच्या व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम माेपलवार यांच्याकडे केली. मिरा-भाईंदरच्या मुख्य मार्गावर असणाऱ्या नऊ सिग्नलमुळे हाेणारी वाहतूककाेंडी कमी करण्यासाठी या मार्गावर तीन उड्डाणपुलांच्या कामास मंजुरी मिळाली आहे. तसे पत्र एमएमआरडीएकडून देण्यात आले. परंतु, या मार्गावरून मेट्राे येत असल्याने उड्डाणपुलाच्या कामाला स्थगिती देण्यात आली हाेती.मेट्राे मार्गाच्या कामात उड्डाणपूल, पादचारी पूल, ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्ट किंवा सरकते जिने, भुयारी मार्ग, पार्किंग व्यवस्था, मिरा-भाईंदरमधून ठाण्याकडे व मुंबईहून मिरा-भाईंदरमध्ये येणारी वाहने राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाशी थेट जाेडली जावीत, रिक्षातळावर सर्व अत्याधुनिक सुविधांचा समावेश करण्यात यावा, अशा मागण्या विचारे यांनी केल्या. त्याला एमएमआरडीएकडून परवानगी देण्यात आल्याने कामाला गती द्यावी, अशा सूचना विचारे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मिरा-भाईंदरमधील मेट्राे मार्ग क्रमांक 9, घाटकाेपर कासारवडवली मार्ग क्रमांक 4 ला जाेडला जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. शहरातील नागरिकांना वसई-विरार, ठाणे व गुजरातच्या दिशेने जाण्यासाठीदेखील वर्साेवा मार्गावर वाहतूककाेंडीचा सामना करावा लागताे.