काेराेना लसीकरणासाठी ठाणे सज्ज

    27-Nov-2020
Total Views |
आयु्नतांची माहिती : आराेग्य यंत्रणेस सतर्कतेचे निर्देश
 
m,ki_1  H x W:
 
ठाणे, 26 नाेव्हेंबर (आ.प्र.) : ठाणे महापालिका क्षेत्रात काेराेनाची स्थिती आटाेक्यात असली, तरी परदेशात, तसेच दिल्लीत आलेल्या काेराेनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्व यंत्रणा सतर्क असल्याची माहिती आयु्नत डाॅ. विपीन शर्मा यांनी दिली. केंद्राकडून काेराेना लस उपलब्ध झाल्यानंतर गाेंधळाची परिस्थिती निर्माण हाेऊ नये म्हणून आतापासूनच त्याचे नियाेजन करण्यात येत आहे. त्यासाठी 70 टक्के तयारी पूर्ण झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.काेराेनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आयु्नतांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी शहरातील परिस्थितीचा आढावा घेऊन सर्वच यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या.
काेराेना लसीकरणासाठी केंद्राने काही सूचना दिल्या असून, त्यासाठी पालिकेने तयारी सुरू केली आहे. शहरातील डाॅक्टर, रुग्णालये, दवाखाने, र्नतपेढी अशी सर्वांची यादी तयार करण्यात येत आहे. येत्या काळात लसीकरणासाठी संपूर्ण आराेग्य सेवकांची माहिती अद्ययावत ठेवण्यात येत असून, ही सर्व कामे 70 टक्के पूर्ण झाली आहेत, असे आयु्नतांनी सांगितले.लसीकरणाबाबत पूर्वतयारी असेल, तर ऐनवेळेस धावपळ हाेणार नाही, त्यामुळे ही पूर्वतयारी करण्यात येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या काेराेनाचा संसर्ग आटाेक्यात असला, तरी काेराेनाबाधितांची संख्या अचानक वाढल्यास प्रशासनावर ताण येऊ नये. तसेच, नागरिकांची गैरसाेय हाेऊ नये, यासाठी आतापासूनच संपूर्ण आराेग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.शहरात मुखपट्टी वापरत नसलेल्या, तसेच साेशल डिस्टन्सिंगच्या नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येणार असून, त्यासाठी येत्या 10 दिवसांत विशेष माेहीम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती आयु्नतांनी दिली.