पाणीपट्टीवसुलीत ठाण्यात पावणेअकरा काेटींची वाढ

    26-Nov-2020
Total Views |
महापालिका माेठ्या थकबाकीदारांची नळजाेडणी ताेडणार
 
mki_1  H x W: 0
 
ठाणे, 25 नाेव्हेंबर (आ.प्र.) : लाॅकडाऊनच्या काळात विविध करांची वसुली ठप्प झाल्याने त्याचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावर झाला असतानाच, आता लाॅकडाऊननंतर ठाणे महापालिकेने सुरू केलेल्या करवसुलीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीबिलांच्या वसुलीत 10 काेटी 71 लाख रुपयांची वाढ झाली, तसेच या वर्षातील उर्वरित वसुलीसाठी पालिकेने कंबर कसली असून, त्यासाठी माेठी थकबाकी असलेल्या इमारतींची नळजाेडणी ताेडण्याची माेहीम प्रशासनाने हाती घेतली आहे.ठाणे महापालिका क्षेत्रात काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययाेजना करण्यात येत आहेत.या कामात महापालिका यंत्रणा सुरुवातीला म्हणजेच एप्रिल ते जून यादरम्यान व्यग्र हाेती. त्यामुळे विविध करांची वसुली करणे प्रशासनाला शक्य झाले नव्हते.
त्याचा परिणाम उत्पन्नवसुलीवर झाल्याने पालिकेपुढे आर्थिक संकट उभे राहिले हाेते. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त डाॅ.
विपिन शर्मा यांनी जूनच्या मध्यावधीपासून मालमत्ताकर, पाणीबिलांसह इतर करांची वसुली करण्यावर भर दिल्याने पालिकेच्या तिजाेरीत कराचे पैसे जमा हाेऊ लागल्याने महापालिकेला काहीसा आर्थिक दिलासा मिळाला आहे.उर्वरित करांच्या वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने थकबाकीदारांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले असून, त्यानुसार माेठी थकबाकी असलेल्या इमारतींची नळजाेडणी ताेडण्याची माेहीम सुरू केली आहे. प्रभाग समितीच्या पथकांकडून ही कारवाई केली जात असल्याची माहिती ठाणे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनाेद पवार यांनी दिली.शहरात जूनच्या मध्यावधीपासून पाणीबिलांची वसुली सुरू झाली असून, 22 नाेव्हेंबरपर्यंत 64 काेटी 2 लाख 71 हजार 21 रुपयांची पाणीबिलांची वसुली झाली.
गेल्या वर्षी 22 नाेव्हेंबरपर्यंत 53 काेटी 31 लाख 3 हजार 797 रुपयांची पाणीबिलांची वसुली झाली हाेती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 10 काेटी 71 लाख 68 हजार 224 रुपयांची वाढ झाली. त्यात रहिवास वापराच्या नळजाेडणीधारकांकडून 57 काेटी 22 लाख 16 हजार 924 रुपयांची, तर व्यावसायिक नळजाेडणीधारकांकडून 3 काेटी 2 लाख 42 हजार 139 रुपयांची वसुली झाली आहे.