काेराेना लसीकरणासाठी महाराष्ट्रात टास्क फाेर्सची स्थापना : मुख्यमंत्री

    26-Nov-2020
Total Views |

म,_1  H x W: 0
 
मुंबई, 25 नाेव्हेंबर (आ.प्र.) : काेराेना लसीबाबत महाराष्ट्र सरकार पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटशी सातत्याने संपर्कात आहे. राज्यात लसीकरण कशा पद्धतीने करावे, लसीचे वितरण यासंदर्भात टास्क फाेर्सही स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना दिली. काेराेनाचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातील आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांनी व्हीसीद्वारे बैठक घेतली. त्यात मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. राज्यात काेराेनाची दुसरी लाट येऊ नये, म्हणून राज्य सरकार सर्वताेपरी काळजी घेत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.दिल्ली, राजस्थान, गाेवा आणि गुजरात या चार राज्यांतून राज्यात येणाऱ्या नागरिकांना काेराेना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. जे कराेना निगेटिव्ह आहेत त्यांनाच महाराष्ट्रात प्रवेश दिला जाईल, अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली. सध्या राज्यात जवळपास 20 हजार खाटा रिक्त आहेत. मुंबईतील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 10 हजारांच्या खाली आल्याची  माहितीही चहल यांनी दिली.