सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वामुळे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात बदल हाेतील

    26-Nov-2020
Total Views |
तज्ज्ञांच्या बैठकीत अमित देशमुख यांचे मत
 
m,of_1  H x W:
 
मुंबई, 25 नाेव्हेंबर (आ.प्र.) : सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वामुळे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल हाेतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केला.वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वाच्या (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप) संभाव्य धाेरणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण संचालक डाॅ. तात्याराव लहाने यांच्यासह डाॅ. गुस्ताद डावर, डाॅ. अजय भांडारवार, डाॅ. संजय बिजवे, पागे उपस्थित हाेते, तर टाटा हाॅस्पिटलचे डाॅ. राजन बडवे, महाराष्ट्र आराेग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. दिलीप म्हैसेकर, डाॅ. भावेश माेदी, डाॅ. चंद्रशेखर ऑनलाइन उपस्थित हाेते.सध्या काेराेनामुळे जगातील, देशातील आणि राज्यातील आराेग्यव्यवस्थेवर ताण आला आहे. असे असले तरी यापुढील काळात सर्वसामान्य नागरिकांनाही उत्तम रुग्णसेवा मिळणे गरजेचे आहे.सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर पूर्णपणे चालवण्यात येणारे टाटा हाॅस्पिटल आणि गुजरातेतील हाॅस्पिटलबाबत पूर्ण पाहणी करून याबाबतचा अहवाल द्यावा, असे देशमुख यांनी सांगितले.डाॅ. संजय बिजवे यांनी सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वाद्वारे येणाऱ्या काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालये कशी सुरू करता येतील, याबाबत सादरीकरण केले. उपस्थित सदस्यांनी याबाबत आपापली मते मांडली.