पंढरपुरात कार्तिकी वारीसही निर्बंध

25 Nov 2020 12:45:51

14_1  H x W: 0  
 
पंढरपूर, 24 नाेव्हेंबर (आ.प्र.) : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीपाठाेपाठ कार्तिकी वारीतही सरकारने अनेक निर्बंध लागू केले आहेत. कार्तिकी वारीकाळात म्हणजेच 21 नाेव्हेंबर ते 1 डिसेंबरपर्यंत चंद्रभागेत स्नान करण्यास बंदी असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 25 ते 27 नाेव्हेंबर असे तीन दिवस श्रीविठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे मुखदर्शन बंद राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जाेशी यांनी दिली.काेराेनाचा संसर्ग वाढू नये म्हणून भाविकांनी पंढरीत येऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दिवाळी पाडव्याला राज्यातील सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली केली. मात्र, काेराेनाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता सरकारने कार्तिकी वारीत पंढरीत गर्दी हाेणार नाही, याची दक्षता घेतली आहे. दुसरीकडे फक्त पंढरपूरचे रहिवासी असलेल्यांना एसटीतून पंढरीस येता येईल. इतरांना प्रवेशबंदी राहणार आहे. दरम्यान, कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा 26 नाेव्हेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हाेणार आहे.
 
Powered By Sangraha 9.0